छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लवकरच ६३७  ग्रामपंचायतींचे कारभारी निवडले जाणार

ग्रामीण भागात पुन्हा एकदा रणधुमाळी रंगणार; जिल्हा प्रशासनाकडून कार्यक्रम जाहीर

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) :  गर परिषद, जिल्हा परिषदेनंतर आता जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे. जिल्ह्यात मुदत संपलेल्या ६२२ व मागील वर्षभरात १५ नवीन ग्रामपंचायती मिळून एकणू ६३७ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. या निवडणुका पावसाळ्यापूर्वी होतील, असा अंदाज आहे.

 जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, तसेच नवनिर्मित ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रभाग रचना करण्याची कार्यवाही तत्काळ सुरु करण्याचे आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने दिले आहेत. जिल्ह्यात ८७० ग्रामपंचायती असून यातील ६३७ ग्रामपंचायतींची मुदत १२ फेब्रुवारी रोजी संपली. ग्रामविकास विभागाने १७ फेब्रुवारी रोजी आदेश जारी करत ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला.

तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या
*छत्रपती संभाजीनगर-७८
*कन्नड-९०
*गंगापूर- ७७
*खुलताबाद-२६
*पैठण-८१
*फुलंब्री-५४
*सिल्लोड-८४
*सोयगाव-४२
*वैजापूर- १०५
*एकूण ६३७

२० फेब्रुवारी ते ४ मेपर्यंत होणार प्रभाग रचना
प्रभाग रचनेचा कार्यक्रम
*२० फेब्रुवारी गुगल अर्थ नकाशे सुपर इम्पोज करून निश्चित करणे.|
*२७ फेब्रुवारी तलाठी, ग्रामसेवक यांनी स्थळपाहणी करून प्रभाग पाडणे.
*९ मार्च तहसीलदारांच्या समितीने प्रारूप रचनेची तपासणी.
*११ मार्च उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर.
*१७ मार्च जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवणे,
*३० मार्च दुरुस्त्यांसह प्रारूप रचनेला तहसीलदारांच्या समितीची मान्यता.
*७ एप्रिल प्रारूप प्रभाग रचनेला प्रसिद्धी (हरकती मागवणे).
*१३ एप्रिल हरकती सादर करण्याची अंतिम मुदत.
*२१ एप्रिल हरकती व सूचनांवर सुनावणी.
*२८ एप्रिल अंतिम प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आयोगास सादर.
*४ मे अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करणे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अचानक टायर फुटले; भरधाव कार रस्त्याच्या कडेला उलटल्याने तरुण व्यापाऱ्याने गमावला जीव

Latest News

अचानक टायर फुटले; भरधाव कार रस्त्याच्या कडेला उलटल्याने तरुण व्यापाऱ्याने गमावला जीव अचानक टायर फुटले; भरधाव कार रस्त्याच्या कडेला उलटल्याने तरुण व्यापाऱ्याने गमावला जीव
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोडपासून २ कि.मी. अंतरावर सोमवारी मध्यरात्री २:४५ वाजेच्या...
छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून ‘बुलेटराजां’वर कारवाईचा दणका
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लवकरच ६३७  ग्रामपंचायतींचे कारभारी निवडले जाणार
डीजे चालकांना पोलिस प्रशासनाची तंबी : कामे घ्याल तर डीजे जप्त करून थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा
खुलताबाद तालुक्यात शेतकऱ्याचा मृतदेह आढळला विहिरीत; रात्रीच्यावेळी पिकांना पाणी देणे बेतले जीवावर
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software