EXCLUSIVE : धक्कादायक... म्‍हैसमाळमध्ये प्रेमीयुगुलाला टोळक्‍याकडून अमानुष मारहाण, व्हिडीओ व्हायरल, युगुलांना हेरून कायम लूट आणि मारहाण करत असतात टोळके

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील एका गावातील एक प्रेमीयुगुल म्‍हैसमाळला फिरायला गेले असता टवाळखोरांच्या निशाण्यावर आले. त्‍यांनी युगुलाला घेरून बेदम मारहाण केली. त्‍यातील एका युवकाने तर तरुणीला अक्षरशः अमानुष मारहाण केली. मारहाण करताना तो व्हिडीओत कैद झाला आहे. खुलताबादचे हे टोळके असल्याचे समोर येत असून, ते म्‍हैसमाळला फिरायला येणाऱ्या युगुलांवर लक्षच ठेवून असतात. टप्‍प्‍यात युगुल आले, की त्‍यांना गाठून बेदम मारहाण करून लूटमार करत असतात. याकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून, जे व्हिडीओ व्हायरल होत आहेत, त्‍यात टवाळखोर युवक ज्‍या पद्धतीने युगुलाला मारहाण करत आहेत, हे अत्‍यंत धक्कादायक आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील फुलंब्री पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील एक युगुल म्‍हैसमाळला फिरायला गेले होते. त्‍यांना टवाळखोरांनी हेरले. या युगुलाला गाठून त्‍यांनी विचारणा करत लगेचच मारहाण सुरू केली. सुरुवातीला मुलीने त्‍यांना उत्तर देण्याचा प्रयत्‍न केला. मात्र त्‍यामुळे खवळलेल्या टवाळखोराने तिला अमानुष मारहाण केली. ती भैय्या भैय्या म्‍हणून त्‍याच्या पायात पडत होती, पण तरीही त्‍याला दयामाया येत नव्हती, असे व्हिडीओत दिसत आहे. तो तिच्या पाठीत वारंवार खुंबा घालताना दिसत आहे. तरुणालाही टवाळखोरांनी मारहाण केली.

ही घटना साधारण पंधरा दिवसांपूर्वी घडल्याचे सांगण्यात येते. मात्र आता व्हिडीओ व्हायरल होत असल्याने खळबळ उडाली आहे. आता पावसाळा सुरू झाल्याने म्‍हैसमाळ परिसर बहरला असून, पर्यटकांची गर्दी होत आहे. त्‍यातच अशाप्रकारे टवाळखोर सक्रीय झाले असून, ते प्रेमीयुगुलांना मारहाण करत लुटत असल्याचे प्रकार घडत आहेत. बदनामीच्या भीतीपोटी हे युगुल बेदम मार खाऊन, लुटले जाऊनही कुणाला सांगू शकत नाहीत. याचा फायदा टवाळखोर उचलत आहेत. हे टवाळखोर खुलताबादचे असल्याची चर्चा आहे. आता ग्रामीण पोलीस व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर काय ॲक्‍शन घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

नवीनच... काय तर म्हणे महिला डॉक्‍टरने चिमटे घेतले!, चिकलठाण्याच्या मिनी घाटीत हे काय घडलं...

Latest News

नवीनच... काय तर म्हणे महिला डॉक्‍टरने चिमटे घेतले!, चिकलठाण्याच्या मिनी घाटीत हे काय घडलं... नवीनच... काय तर म्हणे महिला डॉक्‍टरने चिमटे घेतले!, चिकलठाण्याच्या मिनी घाटीत हे काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चिकलठाण्यातील मिनी घाटीत आगळावेगळाच प्रकार समोर आला आहे. तपासताना महिला डॉक्टरने चिमटे घेतल्याचा आरोप गर्भवतीने...
दोन संतापजनक घटना : साडी खरेदीस आलेल्या विवाहितेकडे पाहून सेल्समनचे अश्लील चाळे!, पैठण गेट भागातील घटनेने तणाव; टीव्ही सेंटर भागात विद्यार्थिनीचा पाठलाग करणाऱ्या दोन रोडरोमिओंना चोप!
पानदरिबा भागात तणाव : पोलिसांनी वेळीच धाव घेऊन परिस्थिती आणली नियंत्रणात, दंगा काबू पथक तैनात, नक्की काय झालं...
रेकॉर्डिंगसाठी मोबाइल ठेवून फार्मसीच्या २१ वर्षीय विद्यार्थिनीची किरायाच्या खोलीत आत्‍महत्‍या!, छत्रपती संभाजीनगर शहरातील धक्कादायक घटना
काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software