पनवेल मनपाच्या अतिरिक्‍त आयुक्‍ताचा छ. संभाजीनगरमध्ये महिलेवर वारंवार बलात्‍कार!, लग्‍नाच्या आमिषाने ठेवत होता नैसर्गिक-अनैसर्गिक शरीरसंबंध, तीनदा गर्भपातही करवला

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पनवेल महापालिकेचा अतिरिक्त आयुक्त भारत प्रभाकर राठोड (मूळ रा. परळी, जि. बीड, ह. मु. पनवेल, जि. रायगड) याच्याविरुद्ध छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात बलात्‍काराचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून राठोडने ३९ वर्षीय महिलेवर सिडकोच्या कामगार चौकातील एका अपार्टमेंटमध्ये नैसर्गिक-अनैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे. गुन्हा दाखल करताच मंगळवारी (२९ जुलै) रात्री उशिरा कामगार चौकातील घटनास्थळाची फॉरेन्सिक तज्‍ज्ञांनी तपासणी केली.

महिलेने काय म्‍हटलंय तक्रारीत...
महिलेची राठोडसोबत २०१६ मध्ये ओळख झाली होती. आधी मैत्री झाली, मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर राठोडने तिला वारंवार लग्नाचे आमिष दाखवून कामगार चौकातील एका अपार्टमेंटमध्ये नेत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. २०१६ पासून ते सप्टेंबर २०२४ पर्यंत तो तिच्यासोबत वारंवार नैसर्गिक, अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवत होता. यातून ३ वेळा गर्भवती राहिली होती. तिचा राठोडने गर्भपातही करवला. त्‍याला त्‍याचे नातेवाइक विशाल राठोड व राहुल पूर्ण नाव नाही (रा. उदगीर, जि. लातूर) यांनी मदत केल्याचा आरोपही महिलेने केला. त्‍यामुळे त्‍यांनाही मुकुंदवाडी पोलिसांनी सहआरोपी केले आहे. राठोडने उच्च पदावर असल्याची धमकी दिल्याने तक्रार देण्यास आजवर टाळाटाळ केल्याचे महिलेने म्‍हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक डाके करत आहेत.

३५ वर्षीय शिक्षिकेचे व्हिडीओ कॉलवरून विद्यार्थ्यांसोबत अश्लील चाळे
व्हिडीओ कॉलवरून अश्लील चाळे दाखवत एक शिक्षिका विद्यार्थ्यांना उत्तेजित करत होती. नवी मुंबईच्या कोपरखैरणे पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करून सोमवारी (२८ जुलै) तिला अटक केली आहे. एका विद्यार्थ्यासोबतच तिचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. कोपरखैरणेतील एका शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणारी ३५ वर्षीय शिक्षिका तिच्याच वर्गातील काही अल्पवयीन विद्यार्थ्यांना उत्तेजित करत होती. यासाठी ती स्वतःचे अर्धनग्न फोटो, व्हिडीओ त्यांना इन्स्टाग्रामवर पाठवत होती. त्याशिवाय व्हिडीओ कॉलकरूनअश्लील कृत्य करायची. मात्र, एका विद्यार्थ्यासोबत तिच्या अशा चाळ्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे हा प्रकार पालकांच्या व पोलिसांच्या निदर्शनात आला. तेव्हा तिच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार झाल्यानंतर तिला अटक करण्यात आली. ही शिक्षिका उलवे परिसरात राहणारी असून तिने इतरही काही अल्पवयीन विद्यार्थ्यांना अशाप्रकारे उत्तेजित करून गळाला लावल्याची शक्यता व्यक्त होत आहे. तिने त्यांच्यासोबत गैरकृत्य केले आहे का? याचा अधिक तपास पोलिस करत आहेत. मात्र, शिक्षिकेच्या या कृत्याने पालकांना धक्का बसला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

नवीनच... काय तर म्हणे महिला डॉक्‍टरने चिमटे घेतले!, चिकलठाण्याच्या मिनी घाटीत हे काय घडलं...

Latest News

नवीनच... काय तर म्हणे महिला डॉक्‍टरने चिमटे घेतले!, चिकलठाण्याच्या मिनी घाटीत हे काय घडलं... नवीनच... काय तर म्हणे महिला डॉक्‍टरने चिमटे घेतले!, चिकलठाण्याच्या मिनी घाटीत हे काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चिकलठाण्यातील मिनी घाटीत आगळावेगळाच प्रकार समोर आला आहे. तपासताना महिला डॉक्टरने चिमटे घेतल्याचा आरोप गर्भवतीने...
दोन संतापजनक घटना : साडी खरेदीस आलेल्या विवाहितेकडे पाहून सेल्समनचे अश्लील चाळे!, पैठण गेट भागातील घटनेने तणाव; टीव्ही सेंटर भागात विद्यार्थिनीचा पाठलाग करणाऱ्या दोन रोडरोमिओंना चोप!
पानदरिबा भागात तणाव : पोलिसांनी वेळीच धाव घेऊन परिस्थिती आणली नियंत्रणात, दंगा काबू पथक तैनात, नक्की काय झालं...
रेकॉर्डिंगसाठी मोबाइल ठेवून फार्मसीच्या २१ वर्षीय विद्यार्थिनीची किरायाच्या खोलीत आत्‍महत्‍या!, छत्रपती संभाजीनगर शहरातील धक्कादायक घटना
काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software