- Marathi News
- सिटी क्राईम
- छत्रपती संभाजीनगरात थोड्याच्या पैशांसाठी चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ, क्षमतेपेक्षा जास्त खच्चून भरल्य...
छत्रपती संभाजीनगरात थोड्याच्या पैशांसाठी चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ, क्षमतेपेक्षा जास्त खच्चून भरल्या जातात स्कूल व्हॅन, रिक्षा, पोलिसांनी केली २३३ वाहनांची तपासणी

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : थोड्याच्या पैशांसाठी चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या स्कूल बस, व्हॅन आणि रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी मंगळवारी (२९ जुलै) कारवाई केली. यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे. २३३ वाहनांची तपासणी केली, त्यात १२१ चालक सदोष पद्धतीने वाहतूक करत होते. सहायक पोलीस आयुक्त धनंजय पाटील यांनी पत्रकारांना कारवाईची माहिती दिली. त्यांनी सांगितले, की ४० टक्के रिक्षाचालकांकडे रिक्षाचा परवानाच नव्हता.
-टेम्पो व्हॅनमध्ये २० पेक्षा अधिक, तर रिक्षांत १२ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक.
-छावणी परिसरात दोन बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते.
-शाळांकडे त्यांच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांची नोंदच नसते.
-जवळपास १० टक्के वाहनांचे नव्हते फिटनेस सर्टिफिकेट.
-१७ व्हॅनचालकांकडून विनागणवेश, विनापरवाना वाहतूक.
काय आहे नियमावली...
-६ वर्षांखालील मुलांना ने-आण करताना महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी.
-वाहनचालक, कंडक्टर, क्लीनरची पोलीस पडताळणी करून घ्यावी.
-वाहनचालक प्रशिक्षित, नैतिकदृष्ट्या सक्षम असल्याची खात्री परिवहन समितीने करावी.
-चालक व अटेंडंट यांचे चारित्र्य पडताळणी, नेत्र आणि वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.
-सीसीटीव्ही कॅमेरा प्रत्येक बसमध्ये बसवणे बंधनकारक.