- Marathi News
- सिटी क्राईम
- दोन संतापजनक घटना : साडी खरेदीस आलेल्या विवाहितेकडे पाहून सेल्समनचे अश्लील चाळे!, पैठण गेट भागातील घ...
दोन संतापजनक घटना : साडी खरेदीस आलेल्या विवाहितेकडे पाहून सेल्समनचे अश्लील चाळे!, पैठण गेट भागातील घटनेने तणाव; टीव्ही सेंटर भागात विद्यार्थिनीचा पाठलाग करणाऱ्या दोन रोडरोमिओंना चोप!
On
.jpg)
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : राखी पौर्णिमेसाठी साडी खरेदी करण्यास पैठण गेट भागातील दुकानात आलेल्या युवतीकडे बघून सेल्समन अल्पवयीन तरुणाने अश्लील चाळे केले. ही बाब युवतीने भावाला सांगितली. ते लक्षात येताच जहीर (नाव बदलले आहे) मागच्या दरवाजाने पळून गेला. दुकानमालकाकडून नाव, पत्ता घेत युवतीच्या भावाने युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना कळवले. लगेचच युवा सेनेचे आदित्य दहिवाळ हे पदाधिकाऱ्यांसह तिथे आले. जहीरच्या समर्थनार्थ लगेचच दुसरा बाजूचा जमावही जमला. दोन गट आमने-सामने आले होते. नंतर या प्रकरणाची तक्रार पोलिसांत करण्यात आली. क्रांती चौक पोलिसांनी विधिसंघर्ष बालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हा धक्कादायक प्रकार बुधवारी (३० जुलै) सायंकाळी पाचच्या सुमारास घडला.
टीव्ही सेंटर भागात युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी दोन रोडरोमिओंची मंगळवारी (२९ जुलै) चांगलीच धुलाई केली. अभ्यासिकेतून रूमवर परतणाऱ्या तरुणीचा पाठलाग करून त्यांनी छेड काढली होती. टीव्ही सेंटर भागात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या, कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अनेक तरुणी राहतात. अभ्यासिकेतून रात्री खोलीवर जातात. मंगळवारी रात्री एक तरुणी खोलीकडे जात असताना दोन रोडरोमिओंनी पाठलाग सुरू केला. तिची छेड काढायला सुरुवात केली. ही माहिती मिळताच युवा सेनेचे पदाधिकारी स्वप्निल भांगे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावले. त्यांनी रोडरोमिओंना जाब विचारत चांगलीच धुलाई सुरू केली. मुलीची माफी मागायला लावून यापुढे छेड काढणार नाही, असे रोडरोमिओंकडून वदवून घेतले. सिडको पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद नव्हती.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्यू, पैठणची घटना
By City News Desk
अनोळखी पुरुषाकडून लिफ्ट घेणे महिलेला पडले महागात, वाळूजजवळ काय घडलं...
By City News Desk
Feature : अतिसारामुळे शरीर कमकुवत? आयुर्वेदिक उपायाने लगेच मिळेल आराम!
By City News Desk
Latest News
31 Jul 2025 19:19:25
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्याचा हप्ता खात्यात जमा झाल्याचा संदेश लवकरच त्यांच्या...