औरंगाबाद म्हण नाहीतर बहुत मारेंगे म्हणणाऱ्या केळी विक्रेत्‍याविरुद्ध संतापाची लाट, अजिंठ्यात हिंदुत्ववादी संघटनांचा निषेध मोर्चा

On

अजिंठा, ता. सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : व्हिडीओ बनवताना छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख करणाऱ्या युट्यूबरला औरंगाबाद म्हण असे म्हणत बहुत मारेंगे, असे धमकावणाऱ्या धर्मांध केळी विक्रेत्‍याविरुद्ध छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर राज्‍यभरातच संतापाची लाट उसळली आहे. केळी विक्रेत्‍याचा मस्तवालपणा व्हिडीओद्वारे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. हा प्रकार शनिवारी (२६ जुलै)  अजिंठा बसस्थानकावर घडला. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ आणि त्‍या मस्तवाल केळीव्रिकेत्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने मंगळवारी (२९ जुलै) दुपारी अजिंठा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. त्‍यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

या यूट्यूबरचे नाव राजकुमार प्रसाद असून, तो कोणतीही तक्रार न करता तेथून निघून गेला होता. मात्र व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला शोधून जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी त्याचा सत्कार केला आणि ज्या पद्धतीने त्याने धर्मांधाला छत्रपती संभाजीनगर असल्याचे ठणकावून सांगितले, त्याबद्दल कौतुकही केले. दरम्यान, केळी विक्रेत्‍याने झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली असून, मी चुकलो असून मला माफ करा, असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

दुसऱ्या गटाच्या घोषणाबाजीने तणाव
मंगळवारी सकाळी ११ वाजता धानोरा येथून स्वामी सर्वांनंद सरस्वती यांच्या नेतृत्वात स्वामी जगन्नाथ गिरी महाराज, स्वामी महादेवानंद सरस्वती महाराज, नवनीत महाराज देशमुख, संकल्प हिंदू राष्ट्र समितीचे प्रमुख कमलेश कटारिया, सुनील मिरकर यांनी १५० दुचाकीस्वारांसह निषेध मोर्चा काढला. हातात भगवे झेंडे घेऊन मोर्चेकरी घोषणा देत गोळेगावमार्गे अजिंठा बसस्थानकावर आले. या ठिकाणी धक्कादायक प्रकार घडला. दुसऱ्या गटातील काही लोकांनी जमून घोषणाबाजी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. त्यानंतर मोर्चेकरी अजिंठा पोलीस ठाण्यात आले. त्यांनी अजिंठा येथे यूट्यूबरला धमकावणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शिष्टमंडळाने सहायक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यांनी चौकशी करून संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. या वेळी भाजपचे माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, अरुण काळे, विलास काळे, द्वारकादास पंडित, अनिल बनकर, लखन ढगे, राधाकृष्ण काकडे, अमोल काळे, अभय तायडे आदींची उपस्थिती होती.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता

Latest News

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज, ३१ जुलैला निकाल दिला आहे. १७ वर्षांनंतर...
घरी बसून करा हजारो रुपयांचे मोफत फेशियल!; सगळे तुम्हाला विचारतील, तुमच्या चमकत्या त्वचेचे रहस्य काय?
Feature : अतिसारामुळे शरीर कमकुवत? आयुर्वेदिक उपायाने लगेच मिळेल आराम!
रत्नाकर फायनान्समधून महिलांना अश्लील कॉल!; जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, कसे येतात कॉल, कुठून मिळवतात नंबर, जाणून घेऊ...
मोबदला न देता मालमत्ता पाडाल तर सामूहिक आत्‍मदहन करू!;  हर्सूलवासियांचा पवित्रा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software