धक्कादायक : काल्डा कॉर्नरजवळ ३ टवाळखोरांचा कहर, कार अडवून दोन तरुणांना बेदम मारहाण करत कारच्या काचा फोडल्या, गर्दी जमू लागताच कारमधील पैसे घेऊन पसार

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरात कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देण्याचे काम सातत्‍याने टवाळखोर करत आहेत. काल्डा कॉर्नरजवळ ३ टवाळखोरांनी कार अडवून २३ वर्षीय विद्यार्थ्यासह त्‍याच्या मित्राला बेदम मारहाण केली. कारची तोडफोड केली आणि लोकांची गर्दी जमत असल्याचे पाहून कारमधील पैसे घेऊन पसार झाले. जखमी दोन्ही तरुणांवर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले. जवाहरनगर पोलिसांनी ३ टवाळखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्‍यांचा शोध सुरू केला आहे. ही घटना मंगळवारी (२९ जुलै) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

शनिवारीच एका पोलीस अंमलदाराला शिवशंकर कॉलनीत गुंडाने अडवून धमकावले होते. त्‍यानंतर तीनच दिवसांनी हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. अथर्व रवींद्र तोगे (वय २३, रा. आकाशवाणी विष्णूनगर) याने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तो एमजीएम कॉलेजमध्ये बीएच्या शेवटच्या वर्षात शिकतो. त्याचे वडिल प्लॉटिंगचे काम करतात. त्याच्या काकाच्या नावावर असलेली कार घेऊन तो मंगळवारी (२९ जुलै) रात्री आठला उस्मानपुरा भागात गाडीचे टायर खरेदी करण्यासाठी मित्र रोहीत विखेसोबत गेला होता.

तेथून रात्री साडेनऊला ते काल्डा कॉर्नर येथे आले. चेतनानगरकडे जाणाऱ्या रोडसमोर आयोध्या पान मंदिराशेजारी मोटारसायकलीवर (क्र. एमएच २० एफसी ८४८०) तिघे रस्त्याच्या मधोमध थांबलेले होते. त्यांनी अथर्वची कार अडवली. मागे बसलेल्या दोघांनी अथर्वला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अथर्वने कारमधून उतरून त्यांना विचारणा केली असता तिघांनी मिळून अथर्वला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने हातातील कड्याने अथर्वच्या चेहरा व डोक्यावर मारले. त्यामुळे अथर्व जखमी झाला. रोहित विखे यालाही मारहाण करण्यात आली.

त्यांच्यातील एक काळा शर्ट घातलेल्या व्यक्‍ती अथर्वच्या कारमध्ये बसला आणि त्याने गाडीत गीअर बॉक्सच्या समोरील कप्प्यात टायर खरेदीसाठी ठेवलेले आठ हजार दोनशे रुपये घेतले. नंतर गाडीतून उतरून परत अथर्वला मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. त्यातील नारंगी रंगाच्या शर्ट घातलेल्या व्यक्‍तीने कारची गाडीची पुढील व ड्रायव्हर मागील काच दगडाने फोडली. लोकांची गर्दी जमू लागल्याने तिघेही दुचाकीवरून पसार झाले. अथर्वने पावणेअकराच्या सुमारास डायल ११२ ला कॉल करून मदत मागितली असता पोलीस आले. त्यांनी अथर्वला घाटी रुग्णालयात पाठवले. अथर्वच्या तक्रारीवरून लुटमार करणाऱ्या तिन्ही टवाळेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा शोध घेतला जात आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार संजय शिरसाट करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्‍यू, पैठणची घटना

Latest News

नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्‍यू, पैठणची घटना नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्‍यू, पैठणची घटना
पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : झोक्यावरून पडून आपेगाव (ता. पैठण) येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (२९ जुलै)...
अनोळखी पुरुषाकडून लिफ्ट घेणे महिलेला पडले महागात, वाळूजजवळ काय घडलं...
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता
घरी बसून करा हजारो रुपयांचे मोफत फेशियल!; सगळे तुम्हाला विचारतील, तुमच्या चमकत्या त्वचेचे रहस्य काय?
Feature : अतिसारामुळे शरीर कमकुवत? आयुर्वेदिक उपायाने लगेच मिळेल आराम!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software