अप्पर पोलीस अधीक्षक लांजेवार यांचे बनावट फेसबुक खाते बनविणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला अटक!, छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांची राजस्थानमध्ये धडक

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातील तत्कालिन अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल कृष्णा लांजेवार यांचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करणारा भामटा अखेर सापडला आहे. सोमवारी (२८ जुलै) त्‍याला राजस्थानच्या लिली गावात अटक करण्यात छत्रपती संभाजीनगर सायबर पोलिसांना यश आले. त्‍याची आता कसून चौकशी केली जात आहे. नरेशकुमार चौधरी (वय २३, रा. लिली जि. अलवर राज्य राजस्थान) असे त्‍याचे नाव आहे.

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातील तत्कालिन अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल कृष्णा लांजेवार यांचे नाव, छायाचित्र व पदाचा उल्लेख करून सायबर भामट्याने त्यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार केले होते. या खात्‍यातून लांजेवार यांच्या सहकारी, मित्रांना मेसेज पाठवून आर्थिक अडचण आहे, कृपया पैसे पाठवा, असे खोटे मेसेज सायबर भामट्याने केले होते. लांजेवार यांच्या तक्रारीवरून २९ जुलै २०२४ रोजी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

ग्रामीण सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील प्राथमिक माहिती व डिजिटल पध्दतीचा वापर करून बनावट खाते तयार करणाऱ्या सायबर भामट्याचा शोध सुरू केला होता. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे राजस्थान राज्यातील अलवर जिल्ह्यातील लिली या गावातील नरेशकुमार चौधरी याने हे बनावट फेसबुक अकाउंट बनविल्याचे समोर आले. सायबर पोलिसांनी भामट्याचा शोध घेण्यासाठी लिली (राजस्थान) गाठले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने भामट्याचा तपास केला. तो त्याच्या राहत्या घराच्या परिसरात मिळून आला. त्याला सोमवारी (२८ जुलै) शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे बनावट फेसबुक अकाउंटच्या अनुषंगाने अधिक तपास ग्रामीण सायबर पोलीस करत आहे.

पोलिसांचे आवाहन...
जिल्हा ग्रामीण पोलीस दलाकडून आवाहन करण्यात आले आहे, की सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्थिक मदत मागितली तर अशा संदेशाला प्रतिसाद देऊ नये. कोणतीही रक्कम पाठवण्यापूर्वी त्याची वास्तविकता तपासावी. याचप्रमाणे सोशल मीडियावरील बनावट खात्याची तक्रार तत्काळ www.cybercrime.gov.in या सायबर क्राईम पोर्टलवर किंवा सायबर पोलीस ठाण्यात नोंदवावी. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपुत, सहायक पोलीस निरीक्षक विजयसिंग जोनवाल, पोलीस अंमलदार नितीन जाधव, दत्ता तरटे, मुकेश वाघ यांनी केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

नवीनच... काय तर म्हणे महिला डॉक्‍टरने चिमटे घेतले!, चिकलठाण्याच्या मिनी घाटीत हे काय घडलं...

Latest News

नवीनच... काय तर म्हणे महिला डॉक्‍टरने चिमटे घेतले!, चिकलठाण्याच्या मिनी घाटीत हे काय घडलं... नवीनच... काय तर म्हणे महिला डॉक्‍टरने चिमटे घेतले!, चिकलठाण्याच्या मिनी घाटीत हे काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चिकलठाण्यातील मिनी घाटीत आगळावेगळाच प्रकार समोर आला आहे. तपासताना महिला डॉक्टरने चिमटे घेतल्याचा आरोप गर्भवतीने...
दोन संतापजनक घटना : साडी खरेदीस आलेल्या विवाहितेकडे पाहून सेल्समनचे अश्लील चाळे!, पैठण गेट भागातील घटनेने तणाव; टीव्ही सेंटर भागात विद्यार्थिनीचा पाठलाग करणाऱ्या दोन रोडरोमिओंना चोप!
पानदरिबा भागात तणाव : पोलिसांनी वेळीच धाव घेऊन परिस्थिती आणली नियंत्रणात, दंगा काबू पथक तैनात, नक्की काय झालं...
रेकॉर्डिंगसाठी मोबाइल ठेवून फार्मसीच्या २१ वर्षीय विद्यार्थिनीची किरायाच्या खोलीत आत्‍महत्‍या!, छत्रपती संभाजीनगर शहरातील धक्कादायक घटना
काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software