लव्हस्टोरी ते हेटस्टोरी : प्रियकराचा लग्‍नासाठी हट्ट, तिला आई-वडिलांची चिंता, अखेर गळफास घेऊन संपवला किस्सा!, सिडको एन ७ मधील कल्याणीच्या आत्‍महत्‍येप्रकरणी प्रियकर सूरज मोरेविरुद्ध गुन्हा दाखल

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एन ७ मधील ग्रिव्हीज कॉलनीत ३ मैत्रिणींसोबत रूम करून राहणारी बी. फार्मसीची तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी कल्याणी परमेश्वर वायाळ (वय २१, मूळ रा. सावरगाव वायाळ, ता. मंठा, जि. जालना) हिने बुधवारी (३० जुलै) दुपारी आत्‍महत्‍या केल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. तिने टोकाचे पाऊल का उचलले, हे आता समोर आले आहे. कल्याणीची विवाहित बहीण प्रतीक्षा (वय २४) हिने सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चार-पाच वर्षे प्रेमसंबंध असलेला प्रियकर लग्‍नासाठी तिच्याकडे हट्ट करत होता. तिने बोलणे बंद केल्यावर बदनामी करण्याची धमकी देत होता. आई-वडिलांना कळले तर काय होईल, या चिंतेने कल्याणीच्या मनात घर केले होते. यातूनच तिने गळफास घेऊन ‘हेटस्टोरी’ला कायमचा पूर्णविराम दिला.

कल्याणी छत्रपती संभाजीनगरात श्री साई इन्स्टिट्यूटमध्ये बी. फार्मसीच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. ती सिडको एन ७ मधील ग्रिव्हीज कॉलनीत तीन मुलींसह रूम करून राहत होती. सूरज ऊर्फ शुभम मोरे (रा. देवगाव खवणे, ता. मंठा जि. जालना) हाही छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षणासाठी होता (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही). त्याच्यासोबत कल्याणीची चार-पाच वर्षांपासून मैत्री होती. कल्याणी पंधरा दिवसांपूर्वी गावी सावरगाव (ता. मंठा) येथे आली तेव्हा खूप चिंताग्रस्त होती. त्यावेळी तिची बहीण प्रतीक्षा हिने तिला ‘तुला काही त्रास आहे का,’ अशी विचारणा केली. कल्याणीने बऱ्याच वेळानंतर सांगितले की, सूरज मला नेहमी फोन करून त्रास देत आहे.

मला म्हणत आहे की, तू माझ्यासोबत बोलत का नाहीस. मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे. तू माझ्यासोबत लग्न केले नाहीतर मी तुझ्या घरी तुझ्याबद्दल वाईट सांगेल व तुझे-माझे सोबतचे फोटो तुझ्या घरी दाखवेल व तुला बदनाम करेल अशी धमकी सूरज देत असल्याचे कल्याणीने बहिणीला सांगितले. हे सगळे आई-बाबांना कळाले तर त्यांना खूप त्रास होईल. मी रक्षाबंधनपर्यंत छत्रपती संभाजीनगर येथे राहते. त्यानंतर सावरगाव येथे घरी येऊन राहते, असे तिने प्रतीक्षाला सांगितले होते. त्यावर प्रतीक्षाने सूरजला सेलू (जि. परभणी) येथे भेटून समजावूनसुद्धा सांगितले होते. तेव्हा सूरजने प्रतीक्षा व तिच्या पतीला अरेरावीची भाषा करून तिथून निघून गेला होता. त्यानंतर प्रतीक्षाने कल्याणीला सांगितले, की रक्षाबंधननंतर मी तुला आपल्या गावी मंठा येथे घेऊन जाते. त्यानंतर ती नेहमी कल्याणीला कॉल करून बोलत होती.

३० जुलैला काय झालं?
रूमवर ३० जुलैला सकाळी नेहमीप्रमाणे सर्व मैत्रिणींनी मिळून स्वयंपाक केला. कल्याणीने भाजी बनवली. तिघी मैत्रिणी डबा घेऊन कॉलेजला गेल्या. कल्याणी घरीच थांबली होती. दुपारी कॉलेजमधून मैत्रिणी घरी आल्यानंतर कल्याणीने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे मैत्रिणींनी खिडकीतून डोकावले असता कल्याणी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. दुपारी दीडच्या सुमारास प्रतीक्षा सावरगाव मंठा येथे असताना कल्याणीच्या मैत्रिणीने कॉल करून सांगितले, की कल्याणी हिची प्रकृती बरी नाही. तुम्ही लवकर या. त्यावर प्रतीक्षाने कल्याणीच्या मोबाइलवर कॉल केला असता तिचा फोन पोलिसांनी उचलून सांगितले की, कल्याणीने गळफास घेतला आहे.

तिला आम्ही तिच्या मैत्रीणींसह घाटी रुग्णालयात आणले आहे. त्‍यामुळे हादरलेल्या प्रतीक्षा व तिच्या आई-वडिलांनी तातडीने छत्रपती संभाजीनगरला येत घाटी रुग्णालय गाठले. तेथे कल्याणी मरण पावल्याचे त्‍यांना समजले. कल्याणीला सूरज मोरे याने वारंवार माझ्यासोबत लग्न कर, असे म्हणून त्रास दिला. बदनामी करण्याची धमकी दिली. ते सहन न झाल्याने कल्याणीने सूरजच्या जाचाला कंटाळून आत्‍महत्‍या केली, असे प्रतीक्षाने तक्रारीत म्‍हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल नाणेकर करत आहेत. कल्याणीने आत्‍महत्‍या केली तेव्हा तिचा मोबाइल समोर एका फळीवर उभ्या अवस्थेत होता. कल्याणी शिक्षण घेतानाच अनुभवासाठी सिडको परिसरातीलच एका मेडिकलमध्ये काम करत होती.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सिडको एमआयडीसी ठाण्यात सराईत गुन्हेगाराशी पोलिसांची जोरदार झटापट; गुन्हेगाराने तोडफोड करत पोलिसांना केली बेदम मारहाण!, दोन पोलीस जखमी, गुन्हेगारही रक्‍तबंबाळ!!

Latest News

सिडको एमआयडीसी ठाण्यात सराईत गुन्हेगाराशी पोलिसांची जोरदार झटापट; गुन्हेगाराने तोडफोड करत पोलिसांना केली बेदम मारहाण!, दोन पोलीस जखमी, गुन्हेगारही रक्‍तबंबाळ!! सिडको एमआयडीसी ठाण्यात सराईत गुन्हेगाराशी पोलिसांची जोरदार झटापट; गुन्हेगाराने तोडफोड करत पोलिसांना केली बेदम मारहाण!, दोन पोलीस जखमी, गुन्हेगारही रक्‍तबंबाळ!!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नारेगाव येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणाऱ्या जनाजा मोर्चात गोंधळ घालणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला पोलिसांनी पकडून सिडको एमआयडीसी...
कब्रस्तानच्या जागेसाठी निघालेला मोर्चा गरवारे चौकात पोलिसांनी अडवला, मोर्चा काढणाऱ्यांना अटक, पावणेदोनशे लोकांविरुद्ध गुन्हा दाखल
लव्हस्टोरी ते हेटस्टोरी : प्रियकराचा लग्‍नासाठी हट्ट, तिला आई-वडिलांची चिंता, अखेर गळफास घेऊन संपवला किस्सा!, सिडको एन ७ मधील कल्याणीच्या आत्‍महत्‍येप्रकरणी प्रियकर सूरज मोरेविरुद्ध गुन्हा दाखल
२५ वर्षीय विशालचा घात की अपघात?, वडोद बाजार पोलिसांकडून चौकशी सुरू, फुलंब्री तालुक्‍यात नक्की काय घडलं...
सैराट पार्ट २ : आधी हॉस्पिटलसमोरून पळवले होते, पोलिसांनी पकडून आणले, आता पुन्हा घरातून प्रेयसीला नेले... मुलगी दहावीत शिकते, मुलगा २१ वर्षांचा, बजाजनगरातील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software