- Marathi News
- सिटी क्राईम
- डिजिटल अरेस्ट रॅकेट छत्रपती संभाजीनगरातून?; तामिळनाडूच्या पोलिसांनी वाळूज MIDC तून दोघांना केली अटक
डिजिटल अरेस्ट रॅकेट छत्रपती संभाजीनगरातून?; तामिळनाडूच्या पोलिसांनी वाळूज MIDC तून दोघांना केली अटक
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सध्या देशात डिजिटल अरेस्ट हे सायबर भामट्यांचे कुटील कारस्थान चर्चेत आहे. छत्रपती संभाजीनगरातही अनेकांना या प्रकारे लुटण्यात आले आहे. या रॅकेटमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या दोघांना सहभाग आढळल्याने खळबळ उडाली आहे. तामिळनाडू पोलिसांनी शहरातील वाळूज एमआयडीसीत कारवाई करत श्रीकांत सुरेशराव गाडेकर (वय ३४, रा. वडगाव कोल्हाटी, छत्रपती संभाजीनगर), नरेश कल्याणराव शिंदे (वय २६, रा. आर्यन सिटी, तिसगाव चौफुली, वाळूज महानगर) या भामट्यांना अटक केली. ते अनेक दिवसांपासून दिवसभर देवळाई परिसरात हॉटेलमध्ये खोली बुक करून डिजिटल अरेस्टचा खेळ खेळत होते. त्यांच्या खात्यात १ कोटी ३६ लाख रुपये असल्याचे समोर आले.
प्रभाकरन यांनी पोलिसांत तक्रार केली. त्याचा तांत्रिक सुरू असताना तामिळनाडू पोलिसांना छत्रपती संभाजीनगरमधून भामटे रॅकेट हाताळत असल्याचे कळले. पोलीस निरीक्षक व्ही. के. सशिकुमार २९ जुलैला पथकासह छत्रपती संभाजीनगरात आले आणि त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांची भेट घेतली. पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या मदतीला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, अंमलदार श्रीमंत भालेराव, अशोक वाघ, शिवानंद वनगे यांची टीम दिली.
तपासात दोन्ही भामटे देवळाई चौकातील एका हॉटेलमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने हॉटेल गाठत श्रीकांत व नरेशला अटक केली. तामिळनाडू सायबर पोलिसांनी सातारा पोलीस ठाण्यात नोंद करून दोन्ही भामट्यांना सोबत नेले आहे. दोघांनीही इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेले असून, काही दिवस त्यांनी खासगी कंपनीत नोकरीही केली आहे. घरातून बाहेर पडताना नोकरीवर जात असल्याचे सांगत होते. पोलिसांनी दोघांकडून ९ मोबाइल जप्त केले. १५ हून अधिक सिमकार्ड, ३ पासबुकही जप्त केले. नरेशचे राहणीमान पोलिसासारखे आहे. डिजिटल अरेस्टमध्ये सावज अडकले, की दोघेही स्वतः पोलीस भासवत. पोलिसांचा गणवेश, पोलिसांचे दालन, मागे तसा सेटअप करून व्हिडीओ कॉलद्वारे विश्वास संपादित करत. यासाठी हॉटेलमध्ये मुक्कामी थांबत होते. दोघेही मोठ्या रॅकेटशी जोडले गेलेले असल्याची शक्यता आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
सेंट्रल नाक्याजवळील दोन दुकानांना भीषण आग, लाखोंचे नुकसान
By City News Desk
Latest News
02 Aug 2025 15:16:39
फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : फुलंब्री तालुक्यातील टाकळी कोलते येथील २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह फुलंब्री-राजूर रोडवर पाझर तलावाजवळ संशयास्पद स्थितीत आढळल्याने...