कुख्यात गुंड जमीर कैचीने निर्माण केली दहशत, खंडणीसाठी मोबाइल दुकान फोडले, व्यावसायिकावर लोखंडी सळईचे वार, किराडपुऱ्यातील धक्कादायक घटना

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरात कुख्यात गुंड जमीर कैची याने दहशत निर्माण केली आहे. व्यापाऱ्यांना खंडणी मागतो, न दिल्यास दुकानाची तोडफोड करतो. किराडपुरा रोडवरील राममंदिरजवळील अदिबा मोबाइल शॉपची तोडफोड केल्यानंतर जिन्सी पोलिसांनी त्‍याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्‍याच्या हल्ल्यात व्यावसायिक जखमी झाला आहे. बुधवारी (३० जुलै) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.

जमील खान अफसर खान (वय ४३, रा. आझाद चौक, गल्ली नं.११) यांनी याप्रकरणात तक्रार दिली आहे. त्‍यांचे अदिबा मोबाइल शॉप आहे. ८ दिवसांपासून जमीर कैची त्यांना फोन करून पैशाची मागणी करत होता. जमील खान हे मोबाईल शॉपवर असताना जमीर कैची आला. सोबत त्‍याचा साथीदारही होता. पैसे का देत नाही, असे म्हणून जमीरने लोखंडी सळईने काऊंन्टर फोडले.

खान यांना शिवीगाळ करून तू पैसे दिले नाहीतर जीवे मारून टाकेन,  अशी धमकी दिली. खान हे समजावून सांगत असताना जमीरने त्‍यांच्यावर  सळईने डाव्या हाताच्या दंडावर मारून जखमी केले. खान यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तक्रार घेत उपचारासाठी घाटी रुग्णालयात पाठवले. अधिक तपास पोलीस अंमलदार महादेव शिरसाट करत आहेत. जमीर कैची हा सराईत गुन्हेगार असून, नागरिकांना धमकावून पैसे उकळतो. त्‍यातून नशा करतो. पैसे देण्यास नकार दिला, की मारहाण करून तोडफोड करतो.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लव्हस्टोरी ते हेटस्टोरी : प्रियकराचा लग्‍नासाठी हट्ट, तिला आई-वडिलांची चिंता, अखेर गळफास घेऊन संपवला किस्सा!, सिडको एन ७ मधील कल्याणीच्या आत्‍महत्‍येप्रकरणी प्रियकर सूरज मोरेविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

लव्हस्टोरी ते हेटस्टोरी : प्रियकराचा लग्‍नासाठी हट्ट, तिला आई-वडिलांची चिंता, अखेर गळफास घेऊन संपवला किस्सा!, सिडको एन ७ मधील कल्याणीच्या आत्‍महत्‍येप्रकरणी प्रियकर सूरज मोरेविरुद्ध गुन्हा दाखल लव्हस्टोरी ते हेटस्टोरी : प्रियकराचा लग्‍नासाठी हट्ट, तिला आई-वडिलांची चिंता, अखेर गळफास घेऊन संपवला किस्सा!, सिडको एन ७ मधील कल्याणीच्या आत्‍महत्‍येप्रकरणी प्रियकर सूरज मोरेविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एन ७ मधील ग्रिव्हीज कॉलनीत ३ मैत्रिणींसोबत रूम करून राहणारी बी. फार्मसीची तिसऱ्या वर्षाची...
२५ वर्षीय विशालचा घात की अपघात?, वडोद बाजार पोलिसांकडून चौकशी सुरू, फुलंब्री तालुक्‍यात नक्की काय घडलं...
सैराट पार्ट २ : आधी हॉस्पिटलसमोरून पळवले होते, पोलिसांनी पकडून आणले, आता पुन्हा घरातून प्रेयसीला नेले... मुलगी दहावीत शिकते, मुलगा २१ वर्षांचा, बजाजनगरातील खळबळजनक घटना
ड्रग्‍ज विकण्यासाठी येताच पोलिसांनी घातली झडप!, चिकलठाण्यात ९० हजारांचे एमडी ड्रग्‍ज जप्त, एकाला अटक, पोलीस पुरवठादाराच्या शोधात
कुख्यात गुंड जमीर कैचीने निर्माण केली दहशत, खंडणीसाठी मोबाइल दुकान फोडले, व्यावसायिकावर लोखंडी सळईचे वार, किराडपुऱ्यातील धक्कादायक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software