कब्रस्तानच्या जागेसाठी निघालेला मोर्चा गरवारे चौकात पोलिसांनी अडवला, मोर्चा काढणाऱ्यांना अटक, पावणेदोनशे लोकांविरुद्ध गुन्हा दाखल

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नारेगाव येथील मुस्लीम समाजाच्या कब्रस्तानसाठी प्रशासनाने जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चातर्फे जिल्हाध्यक्ष संतोष साळवे व शहर कार्याध्यक्ष अलीयार खान यांच्या नेतृत्त्वात शुक्रवारी (१ ऑगस्ट) दुपारी दीडला नारेगाव दर्गावली मशिदीपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जनाजा मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चासाठी परवानगी घेतली नव्हती. त्‍यामुळे गरवारे चौकात सहायक पोलीस आयुक्‍त सुदर्शन पाटील यांनी मोर्चा अडवून धरपकड सुरू केली. मोर्चा काढणाऱ्यांना अटक करत पोलीस ठाण्यात नेले. सुमारे पावणेदोनशे मोर्चेकरूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दुपारी साडेबारापासूनच नारेगावमध्ये बंदोबस्त तैनात केला. पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे यांच्यासह सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यातील १६ अंमलदार व जिन्सी आणि हर्सूल पोलीस ठाण्याचेही अतिरिक्‍त मनुष्यबळ तैनात होते. दुपारी दीडला संतोष साळवे व अलीयार खान यांच्या नेतृत्वात जनाजा मोर्चा निघाला. मोर्चात दीडशे ते पावणेदोनशे लोक सहभागी होते. त्‍यावेळी पोलिसांना साळवे व खान व इतर जमावाला सांगितले, की मोर्चाची आपण रितसर परवानगी घेतलेली नाही. मोर्चा बेकायदेशीर असल्याने व शहरात जमावबंदी आदेश लागू लागल्याने मोर्चा काढू नका, असे समजावून सांगितले.

मात्र त्‍यांनी पोलिसांच्या सूचनांकडे दूर्लक्ष करून बेकायदेशीररित्या घोषणाबाजी करत दर्गावली मशि‍दीपासून पायी जनाजा मोर्चा काढला. मोर्चाबद्दल पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी सहायक पोलीस आयुक्‍त सुदर्शन पाटील यांना माहिती दिली. मोर्चा लहुजी साळवे चौक (गरवारे चौक) येथे दुपारी अडीचला आला असता स्वतः सहायक पोलीस आयुक्त सुदर्शन पाटील लहुजी चौकात (गरवारे चौक) आले. त्यांनी मोर्चेकऱ्यांना थांबविले. मात्र त्‍यांचेही न ऐकता मोर्चातील लोकांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी सर्वांना पकडून सरकारी वाहनाने सातारा पोलीस ठाण्यात पाठवले.

यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
विनापरवाना मोर्चा काढल्याबद्दल सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार विजय तेलुरे यांच्या तक्रारीवरून भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष पुंडलीकराव साळवे (रा. नंदनवन कॉलनी), शहर कार्याध्यक्ष अलीयार खान नुरखान (रा. नारेगाव) यांच्यासह मोसीदखान ताहेरखान, रा. बायजीपुरा, शेख फरहान शेख तालीब, एस.डी.पी.आय. संघटना, जिल्हा पूर्व विधानसभा महासचिव, रा. नारेगाव, शहेबाज मुकीद पठाण, रा. नारेगाव, पटेलनगर, शेख सलमान शेख रऊफ, रा. नारेगाव, बिस्मील्ला कॉलनी, इम्रान पठाण शेरु पठाण, रा. बिस्मील्ला कॉलनी, नारेगाव, मौलाना नईम अहेमद अब्दुल कादर, रा. कटकट गेट, समीर देशमुख कादर देशमुख, रा. नारेगाव, अल्ताफ हकीम पठाण, रा. नारेगाव, दीपक बलराम शिंदे, रा. विकासनगर, परभणी, शेख सलीम शेख उस्मान, रा. दर्गावली मस्जीद अध्यक्ष, रा. नारेगाव, शेख रिजवान शेख अहेमद, रा. नारेगाव, विश्वजीत संजीव गोणारकर, रा. सह्याद्रीनगर, मौलाना सत्तारखान गुलाबखान, रा. नारेगाव, हाफीज खान नूरखान, रा. पटेलनगर, इरफान खान युनूस खान, रा. अजीज कॉलनी, नारेगाव, हकीम शेख सलीम शेख, रा. नारेगाव व इतर १५० ते १७५ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राधा लाटे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

रेल्वेस्टेशनजवळील हॉटेल न्यू पंजाबच्या मालकावर जीवघेणा हल्ला!

Latest News

रेल्वेस्टेशनजवळील हॉटेल न्यू पंजाबच्या मालकावर जीवघेणा हल्ला! रेल्वेस्टेशनजवळील हॉटेल न्यू पंजाबच्या मालकावर जीवघेणा हल्ला!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : रेल्वेस्टेशनजवळील हॉटेल न्यू पंजाबचे मालक रोहित सुनिल राठोड (वय ३५, रा. जालाननगर रेल्वेस्टेशन परिसर) यांच्यावर...
चिकलठाण्यातील वीर गुर्जर फुड्स कंपनीत चोर शिरतात तेव्हा...
औरंगपुऱ्यातील डॉ. नितीन बापट यांच्या क्लिनिकचा प्रताप; वैद्यकीय कचरा थेट रस्‍त्‍यावर!
मनोवृत्ती बदलण्याची ताकद फक्‍त अध्यात्मातच : महंत रामगिरी महाराज; वैजापूरमध्ये १४ गावे मिळून घेताहेत अखंड हरिनाम सप्ताह
‘डेडलाइन’ हुकण्याचा विक्रम नावे असलेला शिवाजीनगर भुयारी मार्ग रात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत राहणार बंद!‌
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software