- Marathi News
- सिटी क्राईम
- सैराट पार्ट २ : आधी हॉस्पिटलसमोरून पळवले होते, पोलिसांनी पकडून आणले, आता पुन्हा घरातून प्रेयसीला नेल...
सैराट पार्ट २ : आधी हॉस्पिटलसमोरून पळवले होते, पोलिसांनी पकडून आणले, आता पुन्हा घरातून प्रेयसीला नेले... मुलगी दहावीत शिकते, मुलगा २१ वर्षांचा, बजाजनगरातील खळबळजनक घटना
On
.jpg)
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वैजापूर तालुक्यातील पालखेड येथील २१ वर्षीय तरुण प्रेमात अक्षरशः वेडापिसा झाल्याचे समोर येत आहे. मात्र त्याची प्रेयसी अल्पवयीन आहे. ती १५ वर्षांची असून, १० वीत शिकते. त्यामुळे तो कायद्याच्या जंजाळात वारंवार अडकत आहे. यापूर्वी २१ एप्रिलला दोघे वाळूज एमआयडीसीच्या महावीर चौकातील सिद्धीविनायक हॉस्पिटलसमोरून पळून गेले होते. त्यावेळी त्याच्यासह त्याला मदत करणाऱ्या दोन मित्रांविरुद्ध अपहरणाचा गुन्हाही दाखल झाला होता. पोलिसांनी दोघांना शोधून आणले होते. आता पुन्हा शुक्रवारी (१ ऑगस्ट) त्याने आपल्या अल्पवयीन प्रेयसीला दुचाकीवरून पळवून नेले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. यात त्याला पुन्हा एका मित्राने मदत केली, हे विशेष.
मुलीच्या आईची प्रकृती ठिक नसल्याने २० एप्रिल २०२५ रोजी रात्री ९ वाजता वाळूज आयडीसीतील महावीर चौकातील सिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यांच्या १५ वर्षीय मुलगीही होती. २१ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता वडील डॉक्टरांसोबत असताना मुलगी हॉस्पिटलबाहेर बसलेली होती. सायंकाळी सहाला तिच्या वडिलांनी हॉस्पिटलबाहेर येऊन पाहिले असता मुलगी दिसून आली नाही. तिला ऋषिकेशने दुचाकीवरून पळवून नेले होते.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
सेंट्रल नाक्याजवळील दोन दुकानांना भीषण आग, लाखोंचे नुकसान
By City News Desk
Latest News
02 Aug 2025 17:34:42
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एन ७ मधील ग्रिव्हीज कॉलनीत ३ मैत्रिणींसोबत रूम करून राहणारी बी. फार्मसीची तिसऱ्या वर्षाची...