दुचाकी चोरून वर्ष उलटले, त्‍याला वाटलं पोलीस विसरले, पण त्‍याचवेळी पोलिसांचे हात त्‍याच्यापर्यंत पोहोचले!, मुकुंदवाडी पोलिसांच्या विशेष पथकाची कामगिरी

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : न्‍यू एसटी कॉलनीतून दुचाकी चोरली आणि वर्ष उलटले, चोराला वाटले पोलीस विसरूनही गेले असतील, पण ज्यावेळी त्‍याला असं वाटलं, त्‍याचवेळी पोलिसांचे हात त्‍याच्यापर्यंत येऊन पोहोचले. मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने आज, १ ऑगस्टला दुपारी अडीचच्या सुमारास या दुचाकीचोराच्या मुसक्या आवळल्‍या.

शुभम बाळासाहेब झगरे (वय २२, रा. पडळसा, ता. गंगापूर) असे पकडण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्‍याने वर्षभरापूर्वी मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत न्यू एसटी कॉलनीतून रायडर बाईक हॅण्डल लॉक तोडून चोरून नेली होती. या चोरीचा तपास करत असताना पोलीस अंमलदार सुजल शर्मा यांना गोपनीय बातमीदाराकडून कळाले, की दुचाकीचोर शुभम झगरे आज छत्रपती संभाजीनगरला येणार आहे. शर्मा यांनी त्‍याचा पाठलाग करून पकडले. त्‍याच्या ताब्‍यातून चोरीची दुचाकी जप्त केली. ही कामगिरी पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन इंगोळे, विशेष पथकाचे  इन्चार्ज श्री. घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सुजल शर्मा, विकास गुरुखेल, संतोष बिरारे यांनी केली. अधिक तपास सहायक फौजदार नरसिंग पवार करत आहेत. सुजल शर्मा यांनी यापूर्वीही अनेक जुने दुचाकीचोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून, गेल्या २ वर्षांत वाळूज, क्रांती चौक, सिडको एमआयडीसी, जवाहरनगर, पैठण, पुणे येथून चोरीला गेलेल्या व ५-६ वर्षे उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांचा सचोटीने तपास करून  वाहने शोधली आहेत, हे विशेष.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

डिजिटल अरेस्ट रॅकेट छत्रपती संभाजीनगरातून?; तामिळनाडूच्या पोलिसांनी वाळूज MIDC तून दोघांना केली अटक

Latest News

डिजिटल अरेस्ट रॅकेट छत्रपती संभाजीनगरातून?; तामिळनाडूच्या पोलिसांनी वाळूज MIDC तून दोघांना केली अटक डिजिटल अरेस्ट रॅकेट छत्रपती संभाजीनगरातून?; तामिळनाडूच्या पोलिसांनी वाळूज MIDC तून दोघांना केली अटक
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सध्या देशात डिजिटल अरेस्ट हे सायबर भामट्यांचे कुटील कारस्थान चर्चेत आहे. छत्रपती संभाजीनगरातही अनेकांना या...
सेंट्रल नाक्‍याजवळील दोन दुकानांना भीषण आग, लाखोंचे नुकसान
प्रेमप्रकरणातून तरुणाला बेदम मारहाण, तू तिला सोड, म्‍हणत लोखंडी पाइप डोक्‍यात घालून केले गंभीर जखमी!; ए.एस. क्‍लबजवळील घटना
पतीपासून विभक्‍त राहणाऱ्या तरुणीसोबत चर्चमध्ये ओळख, नंतर प्रेमासाठी हट्ट, पाठलाग अन्‌ माझ्यासोबत राहा म्‍हणून मारहाण!, बजाजनगरातील घटना
उस्मानपुऱ्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती मिरवणुकीत पोलिसांवर चाकूहल्ला, १ पोलीस जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software