- Marathi News
- सिटी क्राईम
- ड्रग्ज विकण्यासाठी येताच पोलिसांनी घातली झडप!, चिकलठाण्यात ९० हजारांचे एमडी ड्रग्ज जप्त, एकाला अटक...
ड्रग्ज विकण्यासाठी येताच पोलिसांनी घातली झडप!, चिकलठाण्यात ९० हजारांचे एमडी ड्रग्ज जप्त, एकाला अटक, पोलीस पुरवठादाराच्या शोधात
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरात एमडी ड्रग्जचा पुरवठा करणारे रॅकेट समोर येत असून, एका विक्रेत्याला चिकलठाण्यातील द्वारकेश मार्केटजवळ अंमलीपदार्थ प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (३१ जुलै) रात्री साडेनऊला अटक केली. त्याच्या चौकशीतून पुरवठादाराचे नाव समोर आले आहे. या पुरवठादाराचा शोध आता पोलीस घेत आहेत. कारवाईत ९० हजारांचे ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले.
पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांनी शेख अजहरची कसून चौकशी केली असता त्याने आलीम शेख ऊर्फ गुड्डू शेख (रा. चिकलठाणा) याच्याकडून ड्रग्ज आणल्याचे सांगितले. आलीम हा टॉवर उभारण्याचे काम करत असल्याचे सांगत पवनेल, मुंबईला जाऊन ७ दिवसांना १०० ग्रॅम ड्रग्ज आणून शहरात विकतो. अजहरसारखे जवळपास ६ एजंट जिन्सी, बायजीपुऱ्यात त्याच्यासाठी काम करत असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यांचे मुख्य ग्राहक गुन्हेगार, रिक्षाचालक असून, अडीच हजार रुपयांत १ ग्रॅम पावडर विकली जाते. गुटखा व अन्य सुगंधी तंबाखूत थोडी थोडी टाकून नशा केली जात असल्याचा धक्कादायक खुलासाही चौकशीतून झाला. आलीमचा शोध पोलीस घेत असून, त्याला पकडल्यानंतरच अन्य एजंट आणि रॅकेटची पाळेमुळे खोदून काढण्यात पोलिसांना यश येणार आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
सेंट्रल नाक्याजवळील दोन दुकानांना भीषण आग, लाखोंचे नुकसान
By City News Desk
Latest News
02 Aug 2025 17:34:42
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एन ७ मधील ग्रिव्हीज कॉलनीत ३ मैत्रिणींसोबत रूम करून राहणारी बी. फार्मसीची तिसऱ्या वर्षाची...