पत्‍नीला लोखंडी रॉडने मारहाण, पतीविरुद्ध गुन्हा दाखल, सिडको एमआयडीसीतील घटना

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : हुंड्याचे पैसे न दिल्याचा राग उफाळून आल्याने पतीने पत्‍नीला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यात पत्‍नी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पावरलूमजवळील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये बुधवारी (३० जुलै) सकाळी ११ ला घडली.

साक्षी कुमार अमरेंद्र कुमार (वय २७, रा. गॅलेक्सी अपार्टमेंट पावरलूमजवळ) यांच्यावर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांना दिलेल्या जबाबात त्‍यांनी म्‍हटले आहे, की बुधवारी सकाळी ११ ला स्वयंपाक करत पतीने मागील भांडणाच्या कारणावरून साक्षीसोबत वाद घालायला सुरुवात केली. तुझ्या वडिलांनी हुंड्याचे पैसे का दिले नाही, असे विचार तो तिच्या आई-वडिलांना शिवीगाळ करायला लागला. त्याला साक्षीने विरोध केला असता त्‍याने लोखंडी रॉडने तिला मारहाण केली. डोके, पाठ, उजव्या हाताच्या दंडावर रॉडने मारले. साक्षीने पोलिसांना कॉल केला. पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेऊन रुग्णवाहिकेतून तिला चिकलठाण्याच्या मिनी घाटीत दाखल केले. तिथून तिला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पोलिसांनी साक्षीच्या जबाबावरून तिचा पती अमरेंद्र कुमारविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार साहेब खान पठाण करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

डिजिटल अरेस्ट रॅकेट छत्रपती संभाजीनगरातून?; तामिळनाडूच्या पोलिसांनी वाळूज MIDC तून दोघांना केली अटक

Latest News

डिजिटल अरेस्ट रॅकेट छत्रपती संभाजीनगरातून?; तामिळनाडूच्या पोलिसांनी वाळूज MIDC तून दोघांना केली अटक डिजिटल अरेस्ट रॅकेट छत्रपती संभाजीनगरातून?; तामिळनाडूच्या पोलिसांनी वाळूज MIDC तून दोघांना केली अटक
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सध्या देशात डिजिटल अरेस्ट हे सायबर भामट्यांचे कुटील कारस्थान चर्चेत आहे. छत्रपती संभाजीनगरातही अनेकांना या...
सेंट्रल नाक्‍याजवळील दोन दुकानांना भीषण आग, लाखोंचे नुकसान
प्रेमप्रकरणातून तरुणाला बेदम मारहाण, तू तिला सोड, म्‍हणत लोखंडी पाइप डोक्‍यात घालून केले गंभीर जखमी!; ए.एस. क्‍लबजवळील घटना
पतीपासून विभक्‍त राहणाऱ्या तरुणीसोबत चर्चमध्ये ओळख, नंतर प्रेमासाठी हट्ट, पाठलाग अन्‌ माझ्यासोबत राहा म्‍हणून मारहाण!, बजाजनगरातील घटना
उस्मानपुऱ्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती मिरवणुकीत पोलिसांवर चाकूहल्ला, १ पोलीस जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software