पतीपासून विभक्‍त राहणाऱ्या तरुणीसोबत चर्चमध्ये ओळख, नंतर प्रेमासाठी हट्ट, पाठलाग अन्‌ माझ्यासोबत राहा म्‍हणून मारहाण!, बजाजनगरातील घटना

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चर्चमध्ये ओळख झालेल्या २२ वर्षीय तरुणीवर युवकाने प्रेमजाळे फेकले. तिने मैत्री तर केली, पण पुढे अपेक्षित प्रतिसाद देत नसल्याचे संतापलेल्या युवकाने छेड काढून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही धक्कादायक घटना वाळूज एमआयडीसीतील बजाजनगरातील वडगाव कोल्हाटीत बुधवारी (३० जुलै) दुपारी बाराच्या सुमारास घडली. तू माझ्यासोबत नाही राहिली तर तुला मारून टाकीन, अशी धमकीही युवकाने दिली.

संदीप दिलीप गायकवाड (रा. वडगाव कोल्हाटी) असे संशयिताचे नाव आहे. त्‍याच्याविरुद्ध तरुणीच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार २२ वर्षीय रश्मी (नाव बदलले आहे) वडगाव कोल्हाटीत पतीपासून विभक्‍त राहते. तिला चार वर्षांचा मुलगा  आहे. ती एका कंपनीत कामाला जाते. चर्चमध्ये ती प्रार्थनेसाठी जात असते. तिथे प्रार्थनेदरम्‍यान तिची ओळख संदीपसोबत झाली. ओळखीतून मैत्री झाली. पण संदीपच्या मनात काहीतरी वेगळेच शिजत असल्याचे तिच्या लक्षात आले. तो तिच्याकडे वाईट नजरेने पाहायचा.

प्रेमसंबंध निर्माण करण्यासाठी हट्ट करायचा. मला तू खूप आवडते, माझ्यासोबत राहा, असे म्हणत लगट करू लागला. रश्मीने त्याला नकार दिला तरी तो तिला हट्ट करतच राहिला. तो तिच्या नेहमी घरीही येऊ लागला. तिने नातेवाइकांना सांगण्याची धमकी दिल्यानंतर दोन-तीन महिने त्‍याने त्रास दिला नाही. मात्र बुधवारी दुपारी मुलाला शाळेतून घरी घेऊन येत असताना संदीपने तिला रस्त्यात अडवले. तिचा हात धरून माझ्यासोबतच राहा, असे म्‍हणत छेड काढू लागला. रश्मीने विरोध केला असता त्‍याने शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. विष पिऊन आत्‍महत्‍या करेल आणि तुलाही जीवे मारेल, अशी धमकी दिली. रश्मीने आरडाओरड सुरू केल्याने लोक जमले. त्यामुळे संदीप पळून गेला. नंतर रश्मीने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. अधिक तपास सहायक फौजदार सुरेश तारव करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

२५ वर्षीय विशालचा घात की अपघात?, वडोद बाजार पोलिसांकडून चौकशी सुरू, फुलंब्री तालुक्‍यात नक्की काय घडलं...

Latest News

२५ वर्षीय विशालचा घात की अपघात?, वडोद बाजार पोलिसांकडून चौकशी सुरू, फुलंब्री तालुक्‍यात नक्की काय घडलं... २५ वर्षीय विशालचा घात की अपघात?, वडोद बाजार पोलिसांकडून चौकशी सुरू, फुलंब्री तालुक्‍यात नक्की काय घडलं...
फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : फुलंब्री तालुक्‍यातील टाकळी कोलते येथील २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह फुलंब्री-राजूर रोडवर पाझर तलावाजवळ संशयास्पद स्थितीत आढळल्‍याने...
सैराट पार्ट २ : आधी हॉस्पिटलसमोरून पळवले होते, पोलिसांनी पकडून आणले, आता पुन्हा घरातून प्रेयसीला नेले... मुलगी दहावीत शिकते, मुलगा २१ वर्षांचा, बजाजनगरातील खळबळजनक घटना
ड्रग्‍ज विकण्यासाठी येताच पोलिसांनी घातली झडप!, चिकलठाण्यात ९० हजारांचे एमडी ड्रग्‍ज जप्त, एकाला अटक, पोलीस पुरवठादाराच्या शोधात
कुख्यात गुंड जमीर कैचीने निर्माण केली दहशत, खंडणीसाठी मोबाइल दुकान फोडले, व्यावसायिकावर लोखंडी सळईचे वार, किराडपुऱ्यातील धक्कादायक घटना
डिजिटल अरेस्ट रॅकेट छत्रपती संभाजीनगरातून?; तामिळनाडूच्या पोलिसांनी वाळूज MIDC तून दोघांना केली अटक
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software