ट्रक उलटून लोखंडी पोल वृद्धाच्या अंगावर पडले, जागीच मृत्‍यू, कचनेरचा भीषण अपघात, ५ तास वाहतूक खोळंबली

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : करमाड-दहेगाव बंगला राज्य मार्गावरील कचनेर (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव ट्रक उलटला. त्यातील लोखंडी पोल अंगावर पडून रस्त्याच्या कडेला घरासमोर बसलेल्या वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (२९ जुलै) दुपारी १२ च्या सुमारास घडली. गणपत दादा बैटुदे (वय ८० वर्षे, रा. कचनेर) असे मृत्‍यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

ट्रक (क्र. सीजी ०७ बी एस ५०६३) रायपूर (छत्तीसगड) येथून लोखंडी पोल घेऊन पुण्याला जात होता. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान पवार, वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी क्रेनच्या साह्याने पोल उचलून बाजूला केले. त्यानंतर, वाहतूक सुरळीत झाली. तोपर्यंत दुपारी १२:३० ते सायंकाळी ५:३० अशी ५ तास दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंनी पाच किलोमीटरपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.

bobde

पैठणमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्‍यू
दुचाकीस्वाराला उडवून वाहन पसार झाले. यात तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना पैठण- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील टाकळीफाटा येथे सोमवारी (२८ जुलै) रात्री १० वाजता घडली. शंतनू रवींद्र बोबडे (वय १९, रा. वाहेगाव, ता. पैठण) असे मृत्‍यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. शंतनू वाहेगावला दुचाकीने येत होता. अपघाताची माहिती मिळताच पैठण एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शंतनूला रुग्णवाहिकेतून पैठण येथील शासकीय रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मंगळवारी सकाळी ११ वाजता त्याच्या पार्थिवावर वाहेगावमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, आजी-आजोबा, असा परिवार आहे. याप्रकरणी पैठण एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

नवीनच... काय तर म्हणे महिला डॉक्‍टरने चिमटे घेतले!, चिकलठाण्याच्या मिनी घाटीत हे काय घडलं...

Latest News

नवीनच... काय तर म्हणे महिला डॉक्‍टरने चिमटे घेतले!, चिकलठाण्याच्या मिनी घाटीत हे काय घडलं... नवीनच... काय तर म्हणे महिला डॉक्‍टरने चिमटे घेतले!, चिकलठाण्याच्या मिनी घाटीत हे काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चिकलठाण्यातील मिनी घाटीत आगळावेगळाच प्रकार समोर आला आहे. तपासताना महिला डॉक्टरने चिमटे घेतल्याचा आरोप गर्भवतीने...
दोन संतापजनक घटना : साडी खरेदीस आलेल्या विवाहितेकडे पाहून सेल्समनचे अश्लील चाळे!, पैठण गेट भागातील घटनेने तणाव; टीव्ही सेंटर भागात विद्यार्थिनीचा पाठलाग करणाऱ्या दोन रोडरोमिओंना चोप!
पानदरिबा भागात तणाव : पोलिसांनी वेळीच धाव घेऊन परिस्थिती आणली नियंत्रणात, दंगा काबू पथक तैनात, नक्की काय झालं...
रेकॉर्डिंगसाठी मोबाइल ठेवून फार्मसीच्या २१ वर्षीय विद्यार्थिनीची किरायाच्या खोलीत आत्‍महत्‍या!, छत्रपती संभाजीनगर शहरातील धक्कादायक घटना
काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software