टोयोटा कंपनीच्या मॅनेजरला गळ्याला चाकू लावून बिडकीनजवळ लुटले!, रोख रक्कम, कार घेऊन गेला लुटारू...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बिडकीन -पैठण रस्त्यावरील हॉटेल गिरिजाजवळ टोयोटा कंपनीच्या मॅनेजरला शुक्रवारी (२८ नोव्‍हेंबर) सायंकाळी लुटल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. २५ ते ३० वयोगटातील लुटारूने मॅनेजरच्या गळ्याला चाकू लावून कार घेऊन धूम ठोकली. कारमध्ये रोख रक्कमही होती. बिडकीन पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून लुटारूचा शोध सुरू केला आहे.

कृष्णा माने (वय अंदाजे २५ ते ३०, रा. नांदलगाव) असे लुटारूचे नाव समोर येत आहे. अंगद शिवाजी चव्हाण (वय ४१, रा. चरोली खुर्द, ता. राजगुरूनगर, जि. पुणे) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते बिडकीन डीएमआयसीतील टोयोटा कंपनीत मॅनेजर आहेत. शुक्रवारी (२८ नोव्‍हेंबर) सायंकाळी ५ च्या सुमारास अंगद हे कारने जेवण करण्यासाठी डीएमआयसीतून बिडकीन ते पैठण रोडवरील हॉटेल गिरिजा येथे आले. कार हॉटेलसमोर उभी करत असताना काळे कपडे घातलेल्या कृष्णाने कारला दगड मारून थांबण्याचा इशारा केला. त्यामुळे अंगद यांनी कार थांबवली. कृष्णा त्यांच्याकडे आला व चाकू अंगद यांच्या गळ्याला लावला. कारखाली उतर, नाहीतर मी तुला जिवानीशी मारून टाकेन, असे धमकावले. त्यामुळे अंगद कारखाली उतरले.

त्याने अंगद यांना ढकलून देत त्यांची कार घेऊन पैठणच्या दिशेने पळून गेला. अंगद यांनी तातडीने हॉटेल गिरिजामध्ये धाव घेऊन हॉटेलमालकाला सांगितले. त्यांनी हॉटेलसमोरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यांनीच तो कृष्णा असल्याचे त्यांनी सांतिले. अंगद यांनी लगेचच ११२ हेल्पलाइनला कॉल करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. काही वेळाने  बिडकीन पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतली. पोलिसांनी पैठणच्या दिशेने जाणाऱ्या रोडवरील संपूर्ण हॉटेल तपासले. मात्र कृष्णा व कार मिळून आली नाही. कारमध्ये समोरच्या डिक्कीत २० हजार रुपये होते. साडेतीन लाखांची कार आणि २० हजार रुपये रोख असा एकूण ३ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल कृष्णाने लुटून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक नीलेश शेळके करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ

Latest News

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
जमिनीच्या वादातून सेवानिवृत्त वनअधिकाऱ्याचे भरदिवसा अपहरण करून लुटले, ७ तास धरले वेठीस, छत्रपती संभाजीनगरची खळबळजनक घटना
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्‍यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software