शेतात गांजाची पिके, कोर्टाने शेतकऱ्याला सुनावली ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : शेतात गांजाची लागवड करणाऱ्या सुभाष महादू महाजन (रा. सोयगाव) या शेतकऱ्याला ५ वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायाधीश एस. के. कुलकर्णी यांनी बुधवारी (२४ सप्टेंबर) हा निकाल दिला.

सुभाषने शेतातील कपाशी व तुरीच्या पिकांमध्ये गांजाची झाडे लावली होती. १२ ऑक्टोबर २०२२ रोजी पोलिसांनी छापा मारून शेतातून गांजाची ३५ झाडे जप्त केली. सुभाषविरुद्ध सोयगाव पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी तक्रार दिली होती. पोलीस उपनिरीक्षक सतीश पंडित यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी ५ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती न्यायालयाने सुभाषला दोषी ठरवून शिक्षा व दंड सुनावला. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक गणेश जाधव यांनी काम पाहिले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना

Latest News

धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लग्नानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यावर डल्ला मारल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील...
३८ वर्षीय महिलेची राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या, वाळूज MIDC तील घटना
तलावात पोहताना दोन मुलांचा बुडून मृत्यू, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दुर्घटना
करमाडजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : ट्रकने ५ कामगारांना उडवले, तिघांचा जागीच मृत्‍यू, २ गंभीर
वाळूज MIDC तील ठाकरे गटाच्या आंदोलनाला हिंसक वळण!; सोनवणेंना अक्षरशः ढकलत पोलिसांनी गाडीत बसवले, संतप्त नागरिकांनी मडके पोलिसांवर फेकले, हजार-दीड हजार लोकांचा पोलीस ठाण्याला घेराव
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software