१२ वर्षीय मुलीवर दोघांचा लैंगिक अत्याचार, वैजापूर तालुक्यातील खळबळजनक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : १२ वर्षीय मुलीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार विरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पीडित मुलगी ऊसतोड मजुराची मुलगी आहे. विरगाव पोलिसांनी दोघा नराधमांविरुद्ध रविवारी (२९ डिसेंबर) गुन्हा दाखल केला आहे.

गणेश मच्छिंद्र बारसे (वय २२) आणि संजय लक्ष्मण निकम (वय ३१, दोघे रा. विरगाव) अशी नराधमांची नावे आहेत. पोलीस सूत्रांनी सांगितले, की पीडित मुलीचे आई-वडील ऊसतोड कामगार असून, ते विरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऊसतोडीच्या कामाला आले आहेत. २६ डिसेंबरला संध्याकाळी सर्वांचे जेवण झाल्यावर बाथरूमसाठी घराबाहेर पडलेली १२ वर्षीय मुलगी घरी परतली नव्हती. रात्रभर तिचा कुटुंबाने शोध घेतला. दुसऱ्या दिवशीही ती मिळून न आल्याने अखेर विरगाव पोलिसांत तिच्या अपहरणाची तक्रार करण्यात आली होती.

ट्रकवर चालक असलेला गणेश बारसे व क्लिनर असलेल्या संजय निकमने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. त्यांनी मुलीला पळवून पनवेलला नेले होते. सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक माने यांच्या पथकाने पनवेल येथे जाऊन नराधमांच्या मुसक्या आवळल्या आणि १२ तासांतच मुलीची सुटका केली. तिच्या जबाबावरून नराधमांनी तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार समोर आले. त्यांच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैजापूर न्यायालयात दोघांना हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना

Latest News

धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लग्नानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यावर डल्ला मारल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील...
३८ वर्षीय महिलेची राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या, वाळूज MIDC तील घटना
तलावात पोहताना दोन मुलांचा बुडून मृत्यू, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दुर्घटना
करमाडजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : ट्रकने ५ कामगारांना उडवले, तिघांचा जागीच मृत्‍यू, २ गंभीर
वाळूज MIDC तील ठाकरे गटाच्या आंदोलनाला हिंसक वळण!; सोनवणेंना अक्षरशः ढकलत पोलिसांनी गाडीत बसवले, संतप्त नागरिकांनी मडके पोलिसांवर फेकले, हजार-दीड हजार लोकांचा पोलीस ठाण्याला घेराव
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software