- Marathi News
- जिल्हा न्यूज
- सिल्लोडमध्ये घरातच काळ ओढावला!; आजीचा पायऱ्यांवरून घसरून तर युवकाचा घरात शॉक लागून मृत्यू
सिल्लोडमध्ये घरातच काळ ओढावला!; आजीचा पायऱ्यांवरून घसरून तर युवकाचा घरात शॉक लागून मृत्यू
On

सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : वडोद चाथा (ता. सिल्लोड) येथील वृद्ध महिला घरातील पायरीवरून घसरून पडल्याने उपचारादरम्यान शनिवारी (२६ जुलै) सकाळी सातला त्यांचा मृत्यू झाला. २१ जुलैला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्या पडल्या होत्या. कडुबाई नामदेव साळवे (वय ७३) असे त्यांचे नाव आहे. कडुबाई यांना कुटुंबीयांनी तत्काळ छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले होते.
सिल्लोड शहरातील भराडी रस्त्यावरील निसर्गनगर येथे घरात काम करताना विजेचा जोरदार धक्का लागल्याने अनिल प्रकाश दिवटे (वय ३०) यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (२६ जुलै) सकाळी साडेसातला घडली. अनिल दिवटे यांना कुटुंबीयांनी सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणले होते. मात्र डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. दुपारी २ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आहे. या प्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
सेंट्रल नाक्याजवळील दोन दुकानांना भीषण आग, लाखोंचे नुकसान
By City News Desk
Latest News
02 Aug 2025 17:34:42
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एन ७ मधील ग्रिव्हीज कॉलनीत ३ मैत्रिणींसोबत रूम करून राहणारी बी. फार्मसीची तिसऱ्या वर्षाची...