त्रिकूट चोरांना पोलीस कोठडीची ‘लिफ्ट’; गादिया विहारच्या त्रिलोक हाईट्‌समधील साडेतीन लाखांचे लिफ्ट पार्ट्‌स केले होते गायब, जवाहरनगर बीट मार्शल पोलिसांनी म्‍होरक्याला पुण्याहून आणले पकडून

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लिफ्टची आपात्कालीन सेवाच चोरून नेणाऱ्या त्रिकूट चोरांच्या मुसक्या जवाहरनगर पोलिसांनी आवळल्‍या आहेत. शहानूरवाडीतील गादिया विहार येथील त्रिलोक हाईट्‌समध्ये त्‍यांनी साडेतीन लाख रुपयांचे लिफ्ट पार्ट्‌स गायब केले होते. बीट मार्शल पोलिसांनी सलग ३ महिने चिकाटीने माग काढत वाघोली आणि छत्रपती संभाजीनगरातून चोरांच्या मुसक्या आवळल्‍या.

लिफ्ट मेटेनन्सचे काम करणारा सचिन गणेश राठोड (वय २५, रा. चोंडी तार्फ शहापूर ता. औंढा नागनाथ जि. हिंगोली), भंगारवाला शेख इरफान शेख अय्युब (वय ४३, रा. रहीमनगर ग. नं. ६, दरबार हॉटेलजवळ छत्रपती संभाजीनगर, ह. मु. नारेगाव ग. नं. १४ छत्रपती संभाजीनगर), शेख सद्दाम शेख पाशा (वय ३५, रा. साजापूर एमआयडीसी वाळूज एसबीआय बँकेजवळ छत्रपती संभाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ३ मे २०२५ रोजी दुपारी १२ च्या सुमारास शहानूरवाडीतील गादिया विहार येथील त्रिलोक हाईट्‌समधील लिफ्टचे ४ इर्मजन्सी रेस्क्यू डिव्हाइस आणि १६ बॅटरी (किंमत अंदाजे ३ लाख ६० हजार रुपये) चोरीला गेल्या होत्या. त्‍याची तक्रार साईट इंजिनिअर किशोर भास्कर दांडगे (वय ३२, रा. वरुड काझी ता. छत्रपती संभाजीनगर) यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात केली होती.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. २६ जुलै २०२५ रोजी जवाहरनगर बीट मार्शलचे पोलीस अंमलदार मारोती गोरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील संशयित सचिन राठोड हा पुणे येथे आहे. त्‍यांनी लगेचच ही माहिती पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांना दिली. त्‍यानंतर पोलीस अंमलदार दत्तात्रय वानखेडे व मारोती गोरे यांनी सायबर सेलच्या मदतीने पुणे शहरातील वाघोली येथून सचिनला ताब्‍यात घेतले. त्याने चोरीची कबुली दिली. त्‍याला जवाहरनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. न्यायालयात हजर केले असता ६ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली.

पोलीस कोठडीत सचिनने शेख इरफान, शेख सद्दाम यांच्यासोबत मिळून चोरी केल्याचे सांगितले. पोलीस अंमलदार प्रेमा हाके, रमेश खलसे, डी. आर. नलावडे, मारोती गोरे यांनी सापळा रचून शेख इरफान व शेख सद्दाम यांच्या मुसक्या आवळल्‍या. त्‍यांच्याकडून १६ बॅटरी, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, दोन मोबाईल, इलेक्ट्रीक तांब्याची तार असा एकूण १ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सचिनविरुद्ध वाघोली पोलीस ठाण्यातही यापूर्वी लिफ्टचे महागडे पार्ट, बॅटरी, ट्रान्सफार्मर चोरीचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलीस आयुक्त रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार प्रेमा हाके, रमेश खलसे, दत्तात्रय वानखेडे, डी. आर. नलावडे, मारोती गोरे यांनी सायबर सेलच्या मदतीने पार पाडली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

डिजिटल अरेस्ट रॅकेट छत्रपती संभाजीनगरातून?; तामिळनाडूच्या पोलिसांनी वाळूज MIDC तून दोघांना केली अटक

Latest News

डिजिटल अरेस्ट रॅकेट छत्रपती संभाजीनगरातून?; तामिळनाडूच्या पोलिसांनी वाळूज MIDC तून दोघांना केली अटक डिजिटल अरेस्ट रॅकेट छत्रपती संभाजीनगरातून?; तामिळनाडूच्या पोलिसांनी वाळूज MIDC तून दोघांना केली अटक
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सध्या देशात डिजिटल अरेस्ट हे सायबर भामट्यांचे कुटील कारस्थान चर्चेत आहे. छत्रपती संभाजीनगरातही अनेकांना या...
सेंट्रल नाक्‍याजवळील दोन दुकानांना भीषण आग, लाखोंचे नुकसान
प्रेमप्रकरणातून तरुणाला बेदम मारहाण, तू तिला सोड, म्‍हणत लोखंडी पाइप डोक्‍यात घालून केले गंभीर जखमी!; ए.एस. क्‍लबजवळील घटना
पतीपासून विभक्‍त राहणाऱ्या तरुणीसोबत चर्चमध्ये ओळख, नंतर प्रेमासाठी हट्ट, पाठलाग अन्‌ माझ्यासोबत राहा म्‍हणून मारहाण!, बजाजनगरातील घटना
उस्मानपुऱ्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती मिरवणुकीत पोलिसांवर चाकूहल्ला, १ पोलीस जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software