छ. संभाजीनगरमध्ये घरपोच सेवा देणार ‘सेवादूत’; ॲप जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले लोकार्पण

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नागरिकांना विविध प्रकारचे दाखले, सेवा शासनामार्फत घ्याव्या लागतात. या सेवा आता नागरिकांना घरबसल्या मोबाईल ॲपद्वारे दिल्या जाणार आहेत. त्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने ‘सेवादूत’ हे मोबाईल ॲप तयार केले आहे. आज, १ ऑगस्टला हे ॲप जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते लोकांच्या सेवेत रुजू करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात हा सोहळा झाला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, उपजिल्हाधिकारी डॉ. सुचिता शिंदे, एकनाथ बंगाळे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रकल्प व्यवस्थापक शरद दिवेकर उपस्थित होते. शरद दिवेकर यांनी सांगितले की, सेवादूत हे ॲप जिल्हा प्रशासनाने तयार केले आहे. याॲपद्वारे महाऑनलाईन मार्फत दिल्या जाणाऱ्या ८५८ सेवा देता येतील, अशी याची रचना आहे. प्लेस्टोअरवर जाऊन नागरिकांनी हे ॲप डाऊनलोड करावे. तेथे बुक अपॉईंटमेंट करून आपली नोंदणी करावी. ही नोंदणी आधार क्रमांक, मोबाईल क्रमांकासह करता येईल. त्यानंतर ते आपल्याला हव्या त्या सेवेचा तपशिल दिल्यानंतर ही माहिती जिल्ह्याच्या डेटासेंटरकडे पाठविली जाईल. तेथून ती माहिती नागरिकांच्या नजिकच्या सेवा केंद्राकडे अग्रेषित केली जाईल.

संबंधित सेवाकेंद्र चालक हे त्या नागरिकाच्या घरी जाऊन त्यांना हव्या असलेल्या सेवेसाठी आवश्यक कागदपत्रे प्रत्यक्ष पाहून स्कॅन करून अपलोड करेल व त्यानंतर विहित कालावधीत संबंधित नागरिकास सेवा घरपोच दिली जाईल. या सेवेसाठी नागरिकांना १०० रुपये अतिरिक्त आकारले जाणार आहे. ही सेवा ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिक, अथवा आजारी नागरिकांना अधिक उपयुक्त ठरेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नागरिकांना अधिकाधिक सेवा डिजीटल स्वरुपात उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून आणखीन काही सुविधा नागरिकांना देण्यात येतील. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमाचा भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

डिजिटल अरेस्ट रॅकेट छत्रपती संभाजीनगरातून?; तामिळनाडूच्या पोलिसांनी वाळूज MIDC तून दोघांना केली अटक

Latest News

डिजिटल अरेस्ट रॅकेट छत्रपती संभाजीनगरातून?; तामिळनाडूच्या पोलिसांनी वाळूज MIDC तून दोघांना केली अटक डिजिटल अरेस्ट रॅकेट छत्रपती संभाजीनगरातून?; तामिळनाडूच्या पोलिसांनी वाळूज MIDC तून दोघांना केली अटक
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सध्या देशात डिजिटल अरेस्ट हे सायबर भामट्यांचे कुटील कारस्थान चर्चेत आहे. छत्रपती संभाजीनगरातही अनेकांना या...
सेंट्रल नाक्‍याजवळील दोन दुकानांना भीषण आग, लाखोंचे नुकसान
प्रेमप्रकरणातून तरुणाला बेदम मारहाण, तू तिला सोड, म्‍हणत लोखंडी पाइप डोक्‍यात घालून केले गंभीर जखमी!; ए.एस. क्‍लबजवळील घटना
पतीपासून विभक्‍त राहणाऱ्या तरुणीसोबत चर्चमध्ये ओळख, नंतर प्रेमासाठी हट्ट, पाठलाग अन्‌ माझ्यासोबत राहा म्‍हणून मारहाण!, बजाजनगरातील घटना
उस्मानपुऱ्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती मिरवणुकीत पोलिसांवर चाकूहल्ला, १ पोलीस जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software