१.१ कोटींची टोमॅटो खरेदी; ५१ लाख दिले अन् ५० लाख न देता पसार झाले... गंगापूरच्या व्यापाऱ्याला मोठा गंडा, ४ भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : एक कोटी एक लाख रुपयांचे टोमॅटो खरेदी केल्यानंतर त्यातील ५१ लाख ५० हजार रुपये देऊन उर्वरित पैसे न देता परागंदा झालेल्या चौघांविरुद्ध आता शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगापूर तालुक्यातील गवळी शिवरा येथील अनिल दत्तू केरे असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.

केरे यांचा स्थानिक शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करून मोठ्या व्यापाऱ्यांना विकण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. तीन वर्षांपूर्वी अशीच खरेदी करण्यासाठी स्थानिक बाजारपेठेत आलेले हरियाणातील व्यापारी राजूभाई यांच्याशी केरे यांची ओळख झाली होती. या राजूभाई यांनी २५ जुलै रोजी केरे यांना फोन करून टोमॅटो खरेदीची तयारी दाखवली. व्यवहार निश्चित झाल्यावर राजूभाईने प्रवेशकुमार याला टोमॅटो खरेदीसाठी केरे यांच्याकडे पाठवले. १८ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या काळात प्रवेशकुमार याने केरे यांच्याकडून १ कोटी १ लाख रुपयांचे २६ ट्रक भरतील एवढे टोमॅटो खरेदी केले.

या बदल्यात प्रवेशकुमार याने केरे यांच्या बँक खात्यावर दोन बँक खात्यांतून ५१ लाख ५० हजार रुपये पाठवले. पैसे मिळत असल्याने विश्वास बसल्याने केरे यांनी त्याला पूर्ण माल दिला. केरे यांच्या याच विश्वासाचा गैरफायदा घेत प्रवेशकुमार बाकीचे ४९ लाख ५० हजार रुपये न देताच ७ सप्टेंबरला पसार झाला. केरे यांनी त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यावर त्याचा फोनही बंद लागत होता. केरे यांनी वाट पाहून अखेर हरियाणातील राजूभाईला संपर्क साधला.

त्याने आधी सर्व पैसे पाठवण्याची तयारी दाखवली. मात्र, नंतर पैसे देण्यास टाळाटाळ करीत फोन बंद ठेवला. १९ सप्टेंबरपर्यंत वाट पाहिल्यानंतर अखेर वैतागलेल्या केरे यांनी शिल्लेगाव पोलीस ठाणे गाठून १९ सप्टेंबरला रितसर तक्रार नोंदवली. परंतु, पोलिसांनी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यास वेळ घेत १० ऑक्टोबरला गुन्ह्याची नोंद केली. राजूभाई, प्रवेशकुमार उर्फ पवन (दोघांचीही पूर्ण नाव माहिती नाही), भीष्मा उर्फ भीम चौधरी व पवन राठोड (सर्व रा. गुडगाव, हरयाणा) अशी गुन्हा दाखल झालेल्या भामट्यांची नावे आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software