पैठणमध्ये अतिक्रमणे हटवताना पोलिसांशी व्यापाऱ्यांचा वाद; काही मिनिटांत बाजारपेठ झाली बंद..., पुढे काय घडलं...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एकीकडे कामगारांचा देशव्यापी बंद सुरू असताना पैठणमध्ये मात्र वेगळ्याच कारणासाठी व्यापाऱ्यांचा बंद पाहायला मिळाला. शहरातील कोर्ट रॉड परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना व्यापाऱ्यांचा पोलिसांशी वाद झाला. यानंतर व्यापाऱ्यांनी बाजारपेठ आणि बसस्थानक चौकातील दुकाने बंद ठेवून पोलिसांसह नगर परिषद प्रशासनाचा निषेध केला.

येत्या ५ ते ९ मार्च या कालावधीत पैठण शहरात शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा नाथषष्ठी सोहळा पार पडणार आहे. नेहमीप्रमाणे या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक पैठण नगरीत येत असतात. यंदाही या सोहळ्यासाठी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन या भाविकांची गैरसोय टाळण्यासह शहरातील रस्ते मोकळे करण्याच्या हेतूने नगर पालिकेने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. बुधवारपासून सुरू असलेल्या या मोहिमेचे नेतृत्व न. प. मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे या करीत आहेत. गुरुवारी पोलीस बंदोबस्तात न.प.चे पथक बाजारपेठ परिसरात अतिक्रमण पाडण्यासाठी दाखल झाले. उपमुख्याधिकारी सोमनाथ गर्जे यांच्यासह पालिकेच्या मोठ्या फौजफाट्याचा यात समावेश होता. काही गडबड होऊ नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्तही सोबत होता.

कारवाई सुरू होताच एका व्यापाऱ्याने अतिक्रमण पाडण्यास विरोध केला आणि यातून त्याचा पोलिसांशी वादही झाला. यामुळे तणाव निर्माण झाला. यानंतर परिसरातील सर्वच व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी बंदचे अस्त्र उगारले. काही क्षणांतच बाजारपेठ व बसस्थानक परिसरातील दुकाने बंद झाली. बराच वेळ हा बंद चालल्यानंतर व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांची भेट घेतली. त्यांना निवेदन देऊन अतिक्रमण हटाव मोहीम तत्काळ थांबवण्याची मागणी केली. अखेर यात मुख्याधिकारी डॉ. अंभोरे यांनी मध्यस्थी केली. शेवटी व्यापाऱ्यांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेण्याची तयारी दर्शवली. यानंतर डॉ. अंभोरे यांनीही अतिक्रमण हटाव मोहीम दोन दिवस स्थगित करण्याची घोषणा केली. यामुळे तणाव निवळला. असे असले तरी सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

क्यूआर कोड एका नावाने, वर्क ऑर्डर दुसऱ्यालाच; छत्रपती संभाजीनगरच्या बांधकाम विभागात तब्बल १०० कोटींचा घोटाळा?; आता मुख्य अभियंता करणार चौकशी!

Latest News

क्यूआर कोड एका नावाने, वर्क ऑर्डर दुसऱ्यालाच; छत्रपती संभाजीनगरच्या बांधकाम विभागात तब्बल १०० कोटींचा घोटाळा?; आता मुख्य अभियंता करणार चौकशी! क्यूआर कोड एका नावाने, वर्क ऑर्डर दुसऱ्यालाच; छत्रपती संभाजीनगरच्या बांधकाम विभागात तब्बल १०० कोटींचा घोटाळा?; आता मुख्य अभियंता करणार चौकशी!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ‘हपापाचा माल गपापा' म्हणतात तसा प्रकार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उघडकीस आला. जिल्हा नियोजन...
गुबूगुबूऽऽऽ नंदी बैल आला... ब्लॅकमेलिंगचा टोळीने धंदा मांडला, सिडको एन ६ मध्ये सतर्क नागरिकाने केला भंडाफोड!; जे घडलं ते इतकं धक्कादायक, वाचूनच हैराण व्हाल...
दिल्ली गेट ते जहाँगिर कॉलनी सुसाट निघाली स्कॉर्पिओ, मागे पोलिसांची गाडी गाडी... बघणाऱ्यांचा चुकला काळजाचा ठोका!; पुढे काय घडलं...
SHOCKING :  केस वाढलेल्या मुलांना मैदानात उभे करून रबरने केस बांधले... लिपस्टिक लावू, बांगड्या घालायला लावू... शिक्षक उधळले..., चिकलठाण्यातील शारद सुमन शाळेतील प्रकार खळबळ
पैठणमध्ये अतिक्रमणे हटवताना पोलिसांशी व्यापाऱ्यांचा वाद; काही मिनिटांत बाजारपेठ झाली बंद..., पुढे काय घडलं...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software