गोलमाल : आधी मोबाइल नंबर घेतला, नंतर संपर्क वाढवून २ महिने वारंवार करत राहिला बलात्कार!; बजाजनगरातील SHOCKING घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : आधी मोबाइल नंबर घेतला, नंतर संपर्क वाढवून तिच्यावर २ महिने बलात्‍कार केल्याची अजब तक्रार ३८ वर्षीय महिलेने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह येऊन केली आहे. पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अमोल उर्फ लक्ष्मीकांत जोगवडकर (रा.आलोकनगर, सातारा परिसर) असे संशयिताचे नाव आहे. तक्रारदार महिला पतीसोबत बजाजनगर भागात राहते. नोव्हेंबर २०२५ दरम्यान तिची ओळख अमोलसोबत झाली होती. त्याने तिचा मोबाइल क्रमांक घेतला. नंतर फोनद्वारे संपर्क वाढवला. १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे ३ वाजता तो जवळच कामानिमित्त आल्याचे सांगत तिच्या घरी आला. तिचा पती घरी नसल्याचे पाहून अचानक दरवाजा बंद केला आणि ओरडलीस तर तुझ्या नवऱ्याला मारून टाकेन, अशी धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. नंतर २ महिने तो तिच्याशी जबरदस्ती शरीरसंबंध ठेवत गेला. त्याला कंटाळून महिलेने पतीला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर दोघे पोलिसांत तक्रार देण्यासाठी आले. बुधवारी (११ फेब्रुवारी) पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

क्यूआर कोड एका नावाने, वर्क ऑर्डर दुसऱ्यालाच; छत्रपती संभाजीनगरच्या बांधकाम विभागात तब्बल १०० कोटींचा घोटाळा?; आता मुख्य अभियंता करणार चौकशी!

Latest News

क्यूआर कोड एका नावाने, वर्क ऑर्डर दुसऱ्यालाच; छत्रपती संभाजीनगरच्या बांधकाम विभागात तब्बल १०० कोटींचा घोटाळा?; आता मुख्य अभियंता करणार चौकशी! क्यूआर कोड एका नावाने, वर्क ऑर्डर दुसऱ्यालाच; छत्रपती संभाजीनगरच्या बांधकाम विभागात तब्बल १०० कोटींचा घोटाळा?; आता मुख्य अभियंता करणार चौकशी!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ‘हपापाचा माल गपापा' म्हणतात तसा प्रकार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उघडकीस आला. जिल्हा नियोजन...
गुबूगुबूऽऽऽ नंदी बैल आला... ब्लॅकमेलिंगचा टोळीने धंदा मांडला, सिडको एन ६ मध्ये सतर्क नागरिकाने केला भंडाफोड!; जे घडलं ते इतकं धक्कादायक, वाचूनच हैराण व्हाल...
दिल्ली गेट ते जहाँगिर कॉलनी सुसाट निघाली स्कॉर्पिओ, मागे पोलिसांची गाडी गाडी... बघणाऱ्यांचा चुकला काळजाचा ठोका!; पुढे काय घडलं...
SHOCKING :  केस वाढलेल्या मुलांना मैदानात उभे करून रबरने केस बांधले... लिपस्टिक लावू, बांगड्या घालायला लावू... शिक्षक उधळले..., चिकलठाण्यातील शारद सुमन शाळेतील प्रकार खळबळ
पैठणमध्ये अतिक्रमणे हटवताना पोलिसांशी व्यापाऱ्यांचा वाद; काही मिनिटांत बाजारपेठ झाली बंद..., पुढे काय घडलं...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software