- News
- सिटी क्राईम
- SHOCKING : केस वाढलेल्या मुलांना मैदानात उभे करून रबरने केस बांधले... लिपस्टिक लावू, बांगड्या घालाय...
SHOCKING : केस वाढलेल्या मुलांना मैदानात उभे करून रबरने केस बांधले... लिपस्टिक लावू, बांगड्या घालायला लावू... शिक्षक उधळले..., चिकलठाण्यातील शारद सुमन शाळेतील प्रकार खळबळ
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : चिकलठाण्याच्या सावित्रीनगरातील शारदा सुमन शाळेतील एक धक्कादायक प्रकाराने सध्या खळबळ उडाली आहे. शिस्तीच्या नावाखाली या शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अजब शिक्षा केली. केस वाढले म्हणून त्यांना चक्क मुलींसारखे रबर लावून केस बांधायला सांगितले, सोबतच सर्वांसमोर अपमानितही केले, असा आरोप आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण करणाऱ्या प्रकाराचे समर्थन केले जाणार नाही. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जयश्री चव्हाण यांनी म्हटले असून, शाळेवर कडक कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
ज्या मुलांचे केस वाढले होते, त्यांना भर मैदानात उभे करून त्यांचे केस रबरने बांधले गेले. उद्यापासून लिपस्टिक लावू आणि बांगड्या घालायला लावू, असे म्हणत शिक्षकांनी खालच्या पातळीचे शब्द विद्यार्थ्यांसाठी वापरल्याचा आरोप पालकांनी केला आहे. दरम्यान, महापालिका शिक्षणाधिकारी भारत तीनगोटे यांच्यासह कनिष्ठ लिपिक आर. बी. कोलते आणि विशेष शिक्षक गणेश लक्कस यांच्या समितीने चौकशी केली असता नियमबाह्य पद्धतीने विद्यार्थ्यांना वागणूक दिल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या अहवालाआधारे शिक्षणाधिकारी या शाळेवर काय कारवाई करते, की बोटचेपी भूमिका घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. मनपा शिक्षणाधिकारी भारत तीनगोटे यांनी सांगितले, की प्राथमिक चौकशीत शाळा व्यवस्थापनाकडून गंभीर चूक झाली असून, शाळेला नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, शाळेने खुलासा केला की कवायतीसाठी विद्यार्थ्यांनी नीटनेटके यावे, अशी सूचना दिली होती. केस वाढलेले असल्याने त्यांना केवळ शिस्तीच्या उद्देशाने सूचित केले होते, अशी सारवासारव मुख्याध्यापक तुषार दहिहंडे पाटील यांनी केली आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
महाशिवरात्र यात्रेमुळे रविवारी वेरूळमध्ये वाहनांना प्रतिबंध
By City News Desk
Latest News
13 Feb 2026 17:38:31
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ‘हपापाचा माल गपापा' म्हणतात तसा प्रकार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उघडकीस आला. जिल्हा नियोजन...

