- News
- सिटी क्राईम
- छत्रपती संभाजीनगरच्या ड्रग्ज रॅकेटमध्ये २८ वर्षीय तरुणीचा सहभाग, हिशेब सांभाळायची... पैसे तिच्याच खा...
छत्रपती संभाजीनगरच्या ड्रग्ज रॅकेटमध्ये २८ वर्षीय तरुणीचा सहभाग, हिशेब सांभाळायची... पैसे तिच्याच खात्यावर, ड्रग्ज माफियाची विश्वासू मैत्रीण...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ड्रग्ज माफिया अश्पाक शेख इसाक (रा. रवींद्रनगर, शहाबाजार) याची मैत्रीण इशरत अकिब शेख (वय २८, रा. रवींद्रनगर, शहाबाजार) हिला शहर गुन्हे शाखेने अटक केली आहे. अशफाकचे साथीदार तिच्या बँक खात्यावर पैसे पाठवत होते. पोलिसांनी तिच्या ३ बँक खात्यांसह यापूर्वी अटक केलेल्या ८ ड्रग्ज एजंटांचीही बँक खाती गोठवली आहेत. अश्पाक अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
इशरतच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले असून तिला तीन अपत्ये आहेत. रवींद्रनगरमध्ये ती भावासोबत राहते. अश्पाकशी तिचा जुना परिचय आहे. अशफाकच्या सांगण्यावरून ती ड्रग्जचे सर्व खरेदी- विक्रीचे आर्थिक व्यवहार सांभाळत असल्याचा संशय आहे. गेल्या दीड महिन्यात तिच्यात व अशफाकमध्ये ३८३ कॉलद्वारे संपर्क झाला असून, बहुतांश वेळी ते व्हॉट्सअॅप कॉलचा वापर करत होते.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
महाशिवरात्र यात्रेमुळे रविवारी वेरूळमध्ये वाहनांना प्रतिबंध
By City News Desk
Latest News
13 Feb 2026 17:38:31
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ‘हपापाचा माल गपापा' म्हणतात तसा प्रकार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उघडकीस आला. जिल्हा नियोजन...

