डोहात बुडून ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्‍यू, गंगापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गंगापूर तालुक्यातील तालुक्यातील पेंडापूर शिवारातील खैरगव्हाण येथे वीटभट्टीसाठी तयार केलेल्या पाण्याच्या डोहात बुडून ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी (१२ फेब्रुवारी) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

विराज रोहिदास लोणकर (वय ४) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. खैरगव्हाण येथे रोहिदास लोणकर कुटुंबासह राहतात. त्यांचा वीटभट्टीचा व्यवसाय आहे. गुरुवारी सायंकाळी रोहिदास एका लग्नावरून घरी आले. कुटुंबासह वीटभट्टीवर काम करत असताना सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांचा मुलगा विराज खेळता खेळता वीटभट्टीसाठी तयार केलेल्या पाण्याच्या डोहात बुडाला. ही बाब लक्षात येईपर्यंत बराच उशीर झाला. कुटुंबीयांनी विराजला पाण्याबाहेर काढून गंगापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉ. साजिद शेख यांनी तपासून मृत घोषित केले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

क्यूआर कोड एका नावाने, वर्क ऑर्डर दुसऱ्यालाच; छत्रपती संभाजीनगरच्या बांधकाम विभागात तब्बल १०० कोटींचा घोटाळा?; आता मुख्य अभियंता करणार चौकशी!

Latest News

क्यूआर कोड एका नावाने, वर्क ऑर्डर दुसऱ्यालाच; छत्रपती संभाजीनगरच्या बांधकाम विभागात तब्बल १०० कोटींचा घोटाळा?; आता मुख्य अभियंता करणार चौकशी! क्यूआर कोड एका नावाने, वर्क ऑर्डर दुसऱ्यालाच; छत्रपती संभाजीनगरच्या बांधकाम विभागात तब्बल १०० कोटींचा घोटाळा?; आता मुख्य अभियंता करणार चौकशी!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ‘हपापाचा माल गपापा' म्हणतात तसा प्रकार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उघडकीस आला. जिल्हा नियोजन...
गुबूगुबूऽऽऽ नंदी बैल आला... ब्लॅकमेलिंगचा टोळीने धंदा मांडला, सिडको एन ६ मध्ये सतर्क नागरिकाने केला भंडाफोड!; जे घडलं ते इतकं धक्कादायक, वाचूनच हैराण व्हाल...
दिल्ली गेट ते जहाँगिर कॉलनी सुसाट निघाली स्कॉर्पिओ, मागे पोलिसांची गाडी गाडी... बघणाऱ्यांचा चुकला काळजाचा ठोका!; पुढे काय घडलं...
SHOCKING :  केस वाढलेल्या मुलांना मैदानात उभे करून रबरने केस बांधले... लिपस्टिक लावू, बांगड्या घालायला लावू... शिक्षक उधळले..., चिकलठाण्यातील शारद सुमन शाळेतील प्रकार खळबळ
पैठणमध्ये अतिक्रमणे हटवताना पोलिसांशी व्यापाऱ्यांचा वाद; काही मिनिटांत बाजारपेठ झाली बंद..., पुढे काय घडलं...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software