खळबळजनक : मयूर पार्कमध्ये भरदिवसा उद्योजकाचे घर फोडले, १५ लाखांची रोकड नेली...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भर दिवसा घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील १५ लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मयूर पार्कमधील हरसिद्धी हाऊसिंग सोसायटीत मंगळवारी (१० फेब्रुवारी) दुपारी समोर आली. हर्सूल पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वाळूजला वाहनांचे पार्ट्‌स तयार करण्याची कंपनी असलेले उद्योजक अशोक जगधने (वय ६२) हे पत्नीसह राहतात. त्यांची पत्नी देखील नोकरी करते. त्यांच्या घराजवळच त्यांची मुलगीही राहते. मंगळवारी सकाळी ११ वाजता पती-पत्‍नी नेहमीप्रमाणे कामावर गेले. दुपारी ३:३० वाजता त्यांचे घरकाम करणारी महिला घरी आली असता घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला होता. चोरांनी आतील खोलीतील लाकडी कपाटाचे लॉकर तोडून त्यातील १५ लाख रुपयांची रोकड चोरून नेली. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त मनोज पगारे, पोलीस निरीक्षक स्वाती केदार, पोलीस उपनिरीक्षक सचिन पागोटे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. जगधने यांच्या घराला अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे असून, आठ ते दहा दिवसांपासून मात्र कॅमेरे अचानक बंद होते. घरात दागिने असतानाही चोरांनी केवळ रोकडच चोरली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

क्यूआर कोड एका नावाने, वर्क ऑर्डर दुसऱ्यालाच; छत्रपती संभाजीनगरच्या बांधकाम विभागात तब्बल १०० कोटींचा घोटाळा?; आता मुख्य अभियंता करणार चौकशी!

Latest News

क्यूआर कोड एका नावाने, वर्क ऑर्डर दुसऱ्यालाच; छत्रपती संभाजीनगरच्या बांधकाम विभागात तब्बल १०० कोटींचा घोटाळा?; आता मुख्य अभियंता करणार चौकशी! क्यूआर कोड एका नावाने, वर्क ऑर्डर दुसऱ्यालाच; छत्रपती संभाजीनगरच्या बांधकाम विभागात तब्बल १०० कोटींचा घोटाळा?; आता मुख्य अभियंता करणार चौकशी!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ‘हपापाचा माल गपापा' म्हणतात तसा प्रकार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उघडकीस आला. जिल्हा नियोजन...
गुबूगुबूऽऽऽ नंदी बैल आला... ब्लॅकमेलिंगचा टोळीने धंदा मांडला, सिडको एन ६ मध्ये सतर्क नागरिकाने केला भंडाफोड!; जे घडलं ते इतकं धक्कादायक, वाचूनच हैराण व्हाल...
दिल्ली गेट ते जहाँगिर कॉलनी सुसाट निघाली स्कॉर्पिओ, मागे पोलिसांची गाडी गाडी... बघणाऱ्यांचा चुकला काळजाचा ठोका!; पुढे काय घडलं...
SHOCKING :  केस वाढलेल्या मुलांना मैदानात उभे करून रबरने केस बांधले... लिपस्टिक लावू, बांगड्या घालायला लावू... शिक्षक उधळले..., चिकलठाण्यातील शारद सुमन शाळेतील प्रकार खळबळ
पैठणमध्ये अतिक्रमणे हटवताना पोलिसांशी व्यापाऱ्यांचा वाद; काही मिनिटांत बाजारपेठ झाली बंद..., पुढे काय घडलं...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software