सिल्लोड तालुक्‍यात अजिंठा पोलिसांची कामगिरी, अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्‍टर पकडले, साडेतीन लाखांची कारवाई

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सिल्लोड तालुक्‍यातील लिहाखेडी फाट्याजवळ अजिंठा पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्‍टर पकडले. चालकाला ताब्‍यात घेत गुन्हा दाखल केला आहे. एकूण ३ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (२६ सप्टेंबर) दुपारी अडीचला करण्यात आली.

पोलीस अंमलदार विकास दुबेले यांनी दिलेल्या तक्रारीवरून पिरखा मांडेखा मेवाती (वय ३८, रा. डोंगरगाव ता. सिल्लोड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास अजिंठा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक श्री. ढाकणे, श्री. दुबेले, श्री. तडवी, श्री. पवार हे गस्तीवर होते. ते गोळेगाव उंडणगाव चौफुलीवर असताना अडीचला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की खेळना नदी पात्रातून पिरखा हा ट्रॅक्टरने वाळू घेऊन लिहाखेडी गावाकडे येत आहे.

पोलिसांनी लगेचच लिहाखेडी फाट्याच्या पुढे छत्रपती संभाजीनगर ते जळगाव रोडवर सापळा रचला. निळ्या रंगाचे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर दिसताच थांबवले. ट्रॉलीत वाळू भरलेली होती. चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना नव्हता. वाळू खेळणा नदीपात्रातून आणल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी २ लाख ८० हजार रुपयांचे ट्रॅक्टर व ८० हजार रुपयांची वाळू जप्त केली. पिरखाला अटक केली. अधिक तपास पोलीस अंमलदार नीलेश शिरस्कर करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना

Latest News

धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लग्नानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यावर डल्ला मारल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील...
३८ वर्षीय महिलेची राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या, वाळूज MIDC तील घटना
तलावात पोहताना दोन मुलांचा बुडून मृत्यू, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दुर्घटना
करमाडजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : ट्रकने ५ कामगारांना उडवले, तिघांचा जागीच मृत्‍यू, २ गंभीर
वाळूज MIDC तील ठाकरे गटाच्या आंदोलनाला हिंसक वळण!; सोनवणेंना अक्षरशः ढकलत पोलिसांनी गाडीत बसवले, संतप्त नागरिकांनी मडके पोलिसांवर फेकले, हजार-दीड हजार लोकांचा पोलीस ठाण्याला घेराव
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software