- News
- जिल्हा न्यूज
- सावधान… लग्नासाठी नवरी बघून देतो म्हणून गंडवणार्या टोळ्या; कन्नडमध्ये एका टोळीला पकडले, लग्नानंतर न...
सावधान… लग्नासाठी नवरी बघून देतो म्हणून गंडवणार्या टोळ्या; कन्नडमध्ये एका टोळीला पकडले, लग्नानंतर नवरी वर्षा दागिने घेऊन पळाली…
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
कन्नड (सीएससीएन वृत्तसेवा ) : एक काळ होता, जेव्हा मुलीला मुलाचं चांगलं स्थळ मिळत नव्हतं… आता काळ बदलला आहे, वंशाच्या दिव्याच्या हव्यासापोटी इतक्या कळ्या जन्माला येण्याआधीच खुडल्या की आता चांगल्या मुलीचं स्थळ शोधता सापडत नाही. चांगलं स्थळ तर सोडा, पण लग्नासाठी अनेकांना मुलगीही भेटत नसल्याचे चित्र आहे. तिशी उलटून चालली तरी लग्न होत नसलेले असे […]
कन्नड (सीएससीएन वृत्तसेवा ) : एक काळ होता, जेव्हा मुलीला मुलाचं चांगलं स्थळ मिळत नव्हतं… आता काळ बदलला आहे, वंशाच्या दिव्याच्या हव्यासापोटी इतक्या कळ्या जन्माला येण्याआधीच खुडल्या की आता चांगल्या मुलीचं स्थळ शोधता सापडत नाही. चांगलं स्थळ तर सोडा, पण लग्नासाठी अनेकांना मुलगीही भेटत नसल्याचे चित्र आहे. तिशी उलटून चालली तरी लग्न होत नसलेले असे सावज काही भामटे हेरत असून त्यांना लग्न लावून देण्याच्या आमिषाने लुटले जात आहे. कन्नड शहर पोलिसांनी अशी टोळी पकडली आहे. नवरी, नवरीची काकू आणि दोन एजंटांना पकडण्यात आले.
पवार आणि दाभाडे यांनी यांनी मुलगी शोधून देण्याचे आमिष दाखवून मुलीच्या बदल्यात 20 हजार रुपये घेतले. मुलीचे आई-वडील कोरोना काळात वारलेले असल्याचे सांगून त्यांच्यावर झालेल्या कर्जाची रक्कम फेडण्यासाठी मुलीची मावसबहीण पूजा फतपुरे हिने दीड लाख रुपये घेतले. लग्नात 26 हजारांचे दागिने घालण्यात आले. वर्षा दशरथ बनसोडे ही नवरी झाली. तिच्यासह नवरीची बहीण पूजा फतपुरे, ज्ञानेश्वर दाभाडेची पत्नी लक्ष्मीबाई, विठ्ठल पवार यांनी लग्नाचा बनाव घडवून आणला. त्यानंतर नवरी वर्षा घरातील कपाटातील 15 हजार रुपये घेऊन पसार झाली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या जस्ट पॅक इंडस्ट्रीज कंपनीला भीषण आग
By City News Desk
Latest News
09 Feb 2026 17:20:30
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वांत क्रूर हत्याकांड घडवणाऱ्या कुख्यात बबला टोळीचा सदस्य शेख अमजद असद...

