- News
- सिटी डायरी
- वेळ साधलीच!; शहागंजमधील अतिक्रमणांवर चालला बुलडोझर, मुजोर हातगाडीवाल्यांना शिकवला धडा!!
वेळ साधलीच!; शहागंजमधील अतिक्रमणांवर चालला बुलडोझर, मुजोर हातगाडीवाल्यांना शिकवला धडा!!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वर्षानुवर्षे शहागंज चमनला मुजोर हातगाडीवाल्यांनी आणि अतिक्रमणांनी घातलेला वेढा अखेर आज, २६ फेब्रुवारीला सकाळी महापालिकेच्या पथकाने बुलडोझर घालून तोडला. बुधवारी (२५ फेब्रुवारी) एका दाम्पत्याला मुजोर हातगाडीवाल्यांनी अमानुष मारहाण केली होती. त्या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली होती. शिंदे गटाचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी याप्रश्नी आक्रमक भूमिका घेऊन प्रशासनाला अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले. त्यानंतर सकाळीच महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग फौजफाट्यासह शहागंजमध्ये दाखल झाला. त्यांनी हातगाड्यांसह, दुकाने, छोटीमोठी अतिक्रमणे अक्षरशः उखडून फेकली. या कारवाईचे शहरात स्वागत होत आहे.
मुजोर हातगाडीवाल्यांनी दुचाकीस्वार प्रणव पगारे (वय २५) आणि त्यांची ५ महिन्यांची गर्भवती पत्नी नंदिनी (वय २३) यांच्यावर झुंडीने हल्ला चढविला होता. छत्रीचा लोखंडी पाइप, स्क्रू ड्रायव्हरने टोळके मारहाण करत होते. हा सर्व प्रकार शहागंज पोलीस चौकीच्या बाजूलाच सुरू होता. चौकीत कुणीही नव्हते. कडी लावलेली होती. नंदिनी व प्रणव यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेबाबत उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी सर्व अतिक्रमणे हटविण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले होते.
दरम्यान, एमआयएमला या मुजोर हातगाडीवाल्यांचा पुळका आला होता. महापालिकेतील विरोधी पक्षनेते अब्दुल समीर यांनी हातगाड्या व अतिक्रमणांवर कारवाईसाठी आमचा पाठिंबा आहे. मात्र रमजान महिना सुरू असल्याने कारवाई करू नये. त्यानंतर होणाऱ्या कारवाईला आमचा पाठिंबा असेल, असे म्हटले होते. मात्र शहरात दबाव वाढल्याने प्रशासनही अलर्ट मोडवर आले होते. विशेष म्हणजे, महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक मंगळवारी दुपारीही शहागंजमध्ये कारवाईसाठी गेले होते. तेव्हा मनपा विरोधी पक्षनेते अब्दुल समीर यांनी या पथकाला अरेरावी करून माघारी जाण्यास भाग पाडले होते.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
सिडको एन ८ मध्ये अनधिकृत फलक लावणाऱ्या हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
By City News Desk
Latest News
26 Feb 2026 18:43:36
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भावसिंगपुऱ्यातील आमेन चौकात हद्दपार गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला झाला. गुन्हेगाराने नातेवाइकांसोबत मिळून पोलिसांवरच...

