लाचखोरीची कीड डोक्यातून जाईना... निवृत्त होऊनही लाच खाण्यासाठी जिल्हा परिषदेत, ६१ वर्षीय नंदकिशोर चव्हाण ACB च्या जाळ्यात!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लाचखोरीची कीड डोक्यात न गेल्याने ६१ वर्षीय नंदकिशोर आसाराम चव्हाण (रा. पडेगाव) याने हद्दच केली. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातून कनिष्ठ सहायक पदावरून सेवानिवृत्त झालेला हा महाभाग जिल्हा परिषदेत लाच खाण्यासाठी येतच होता. जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत शासकीय कामांची ठेकेदारी करण्यासाठी लागणारे नोंदणी प्रमाणपत्र (लायसन्स) काढून देण्यासाठी एका तरुणाकडून १० हजार रुपयांची लाच घेताना चव्हाणला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याबरोबरच एसीबीने चव्हाणच्या घराची झडतीही घेतली. झडतीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. एसीबीच्या माहितीनुसार, २१ वर्षांच्या तरुणाने कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा कोर्स केलेला असून, त्याला जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे नोंदणी प्रमाणपत्र हवे होते. यासाठी त्याने १ जानेवारी २०२६ ला अर्ज केला होता. २४ फेब्रुवारीला तरुण आणि त्याचा मित्र जिल्हा परिषद कार्यालयात आले असता चव्हाणने लायसन्स काढून देतो, असे सांगून प्रत्येकी ७ हजार रुपये याप्रमाणे एकूण १४ हजार रुपये मागितले. तरुणाला लाच देण्याची इच्छा नव्हती. त्याने एसीबी कार्यालयात तक्रार केली. २५ फेब्रुवारीला लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. तडजोडीनंतर दोन्ही फाइल्ससाठी १० हजार रुपये देण्याचे ठरले. बुधवारी (२५ फेब्रुवारी) दुपारी जिल्हा परिषद कार्यालयाच्या गेटसमोरच चव्हाणने लाच घेतली. त्याचबरोबर एसीबीच्या पथकाने त्याच्यावर हल्लाबोल केला. त्याला ताब्यात घेतले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांवर तिसरा हल्ला!; हद्दपार गुन्हेगाराची पोलिसाला बनियान फाटेपर्यंत मारहाण, लोखंडी सुऱ्याने भोसकण्याचा, डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न, भावसिंगपुऱ्यातील आमेन चौकात राडा!!

Latest News

छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांवर तिसरा हल्ला!; हद्दपार गुन्हेगाराची पोलिसाला बनियान फाटेपर्यंत मारहाण, लोखंडी सुऱ्याने भोसकण्याचा, डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न, भावसिंगपुऱ्यातील आमेन चौकात राडा!! छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांवर तिसरा हल्ला!; हद्दपार गुन्हेगाराची पोलिसाला बनियान फाटेपर्यंत मारहाण, लोखंडी सुऱ्याने भोसकण्याचा, डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न, भावसिंगपुऱ्यातील आमेन चौकात राडा!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भावसिंगपुऱ्यातील आमेन चौकात हद्दपार गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला झाला. गुन्हेगाराने नातेवाइकांसोबत मिळून पोलिसांवरच...
वेळ साधलीच!; शहागंजमधील अतिक्रमणांवर चालला बुलडोझर, मुजोर हातगाडीवाल्यांना शिकवला धडा!!
लाचखोरीची कीड डोक्यातून जाईना... निवृत्त होऊनही लाच खाण्यासाठी जिल्हा परिषदेत, ६१ वर्षीय नंदकिशोर चव्हाण ACB च्या जाळ्यात!!
शेतात काम करत असताना अचानक लिंबाच्या झाडाजवळ गेले अन्‌ काही कळण्याच्या आत घेतला गळफास!; कन्नडच्या या गावातील धक्कादायक घटना
गंगापूरची हृदयद्रावक घटना : शेकडोंचे प्राण वाचवणाऱ्या रुग्णवाहिका चालकाचा हार्टॲटॅकने मृत्य!; भाच्याच्या हळदी कार्यक्रमात मनसोक्त नाचले, घरी येऊन झोपले, पुन्हा उठलेच नाहीत...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software