छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांवर तिसरा हल्ला!; हद्दपार गुन्हेगाराची पोलिसाला बनियान फाटेपर्यंत मारहाण, लोखंडी सुऱ्याने भोसकण्याचा, डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न, भावसिंगपुऱ्यातील आमेन चौकात राडा!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भावसिंगपुऱ्यातील आमेन चौकात हद्दपार गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला झाला. गुन्हेगाराने नातेवाइकांसोबत मिळून पोलिसांवरच हल्ला चढवला. अतिरिक्‍त पोलीस कुमक मागवूनही उपयोग झाला नाही. एका पोलिसाला बनियान फाटेपर्यंत मारहाण करण्यात आली. दुसऱ्याला लोखंडी सुऱ्याने भोसकण्याचा प्रयत्‍न झाला. डोक्यात दगड घालून मारण्याचा प्रयत्‍न झाला. पोलीस आणि गुन्हेगाराचे कुटुंब यांच्यात सुरू असलेली धुमश्चक्री पहायला तोबा गर्दी झाली होती. बुधवारी (२५ फेब्रुवारी) सायंकाळी साडेसातनंतर दोन तास जे घडलं ते धक्कादायक होतं...

पोलीस अंमलदार महाशंख दांडगे यांनी ७ जणांविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून छावणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी (२५ फेब्रुवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक श्रीमती हाके, पोलीस अंमलदार पायघन, सोरमारे, परचाके हे अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी गस्तीवर होते. त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की हद्दपार आरोपी ईश्वर राजू चव्हाण सध्या आमेन चौक, भावसिंगपुरा येथे उभा आहे. त्यामुळे पोलिसांनी लगेचच तिथे धाव घेतली. ईश्वरला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात चल, असे म्हटले. त्यावेळी सचिन त्रिभुवन, विकास भालेराव, शकुंतला चव्हाण, अंजली चव्हाण, शिला त्रिभुवन, पायल त्रिभुवन हे आले. त्यांनी पोलिसांसोबत अरेरावी सुरू केली.

शिवीगाळ करून हुज्जत घालू लागले. त्या सर्वांनी पोलिसांच्या दुचाकींच्या चाव्या काढून घेतल्या. त्यामुळे पोलिसांनी मदतीसाठी सहायक पोलीस निरीक्षक जाधव यांना कॉल करून माहिती दिली. त्यांनी तत्काळ पोलीस उपनिरीक्षक खाजेकर, सातपुते, सहायक फौजदार लकडे, पोलीस अंमलदार खान, देशमुख, सूर्यवंशी, महिला पोलीस अंमलदार जाधव, जायभाये, बडुगे, देशमुख, बोढरे यांचा फौजफाटा आमेन चौकात पाठवला. एवढ्या मोठ्या संख्येने पोलिसांना पाहून संतापलेल्या ईश्वर चव्हाण व सचिन त्रिभुवन यांनी पोलीस अंमलदार खान यांना हाताचापटाने मारहाण करून त्यांच्या शर्टच्या आतील बनियान फाडून जखमी केले. ईश्वर चव्हाण याने पोलीस अंमलदार सूर्यवंशी यांच्या हाताला जोराने चावा घेऊन गंभीर जखमी केले. ईश्वर चव्हाणने पोलिसांना धमकावले, की मी सर्व पोलिसांना बघून घेतो.

मी आताच मर्डर केसमधून बाहेर आलो आहे. तुम्हा सर्व पोलिसांना उभ्याने चिरून टाकतो, अशा धमक्या देत होता. मोठा लोखंडी सुरा काढून त्याने पोलीस अंमलदार दांडगे यांच्यावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तो वार चुकवून त्यांनी सुरा हिसकावला. त्यानंतरही सचिन त्रिभुवन याने मोठा दगड उचलून त्यांच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्‍न केला. मात्र वेळीच दांडगे बाजूला झाले. त्यानंतर सचिन त्रिभुवनने स्वतःचे डोके त्याच दगडावर आपटून स्वतःचे डोके फोडून घेत मला पोलिसांनी मारले, असे म्हणून जोरजोरात आरडा ओरड करीत जमाव जमवला. शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या देऊन गर्दीचा फायदा घेऊन पळून गेला. त्यानंतर ईश्वर चव्हाण याला पोलीस नेत असताना त्याची आई शकुंतला चव्हाण व बहीण शितल चव्हाण या वाहनासमोर उभ्या राहून आरडा ओरड करत होत्या. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक काकासाहेब नागवे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांवर तिसरा हल्ला!; हद्दपार गुन्हेगाराची पोलिसाला बनियान फाटेपर्यंत मारहाण, लोखंडी सुऱ्याने भोसकण्याचा, डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न, भावसिंगपुऱ्यातील आमेन चौकात राडा!!

Latest News

छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांवर तिसरा हल्ला!; हद्दपार गुन्हेगाराची पोलिसाला बनियान फाटेपर्यंत मारहाण, लोखंडी सुऱ्याने भोसकण्याचा, डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न, भावसिंगपुऱ्यातील आमेन चौकात राडा!! छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांवर तिसरा हल्ला!; हद्दपार गुन्हेगाराची पोलिसाला बनियान फाटेपर्यंत मारहाण, लोखंडी सुऱ्याने भोसकण्याचा, डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न, भावसिंगपुऱ्यातील आमेन चौकात राडा!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भावसिंगपुऱ्यातील आमेन चौकात हद्दपार गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला झाला. गुन्हेगाराने नातेवाइकांसोबत मिळून पोलिसांवरच...
वेळ साधलीच!; शहागंजमधील अतिक्रमणांवर चालला बुलडोझर, मुजोर हातगाडीवाल्यांना शिकवला धडा!!
लाचखोरीची कीड डोक्यातून जाईना... निवृत्त होऊनही लाच खाण्यासाठी जिल्हा परिषदेत, ६१ वर्षीय नंदकिशोर चव्हाण ACB च्या जाळ्यात!!
शेतात काम करत असताना अचानक लिंबाच्या झाडाजवळ गेले अन्‌ काही कळण्याच्या आत घेतला गळफास!; कन्नडच्या या गावातील धक्कादायक घटना
गंगापूरची हृदयद्रावक घटना : शेकडोंचे प्राण वाचवणाऱ्या रुग्णवाहिका चालकाचा हार्टॲटॅकने मृत्य!; भाच्याच्या हळदी कार्यक्रमात मनसोक्त नाचले, घरी येऊन झोपले, पुन्हा उठलेच नाहीत...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software