महत्त्वाची बातमी : छ. संभाजीनगरात ‘म्हाडा’ सोडत अर्ज भरण्यास ८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने म्हाडा सोडतीच्या अनुषंगाने जास्तीत जास्त नागरिकांना या संधीचा लाभ घेता यावा यासाठी अर्ज भरण्यास ८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी दत्तात्रय नवले यांनी कळविले आहे.

म्हाडाच्या १३४१ सदनिका भूखंडाच्या जून-२०२५ प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने नक्षत्रवाडी, अंबाजोगाई, चिकलठाणा, सातारा, देवळाई येथील विविध योजनेतील अर्ज भरण्यासाठी म्हाडाने ८ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे अर्जदारांना ८ सप्टेंबर रात्री. ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अनामत रकमेचा भरणा करून ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. या जाहिरातीच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या अर्जांची सोडत १ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे सोडत काढण्यात येणार आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता अर्जदारांनी https://housing.mhada.gov.in किंवा https://www.mhada.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. या सोडतीकरिता मंडळातर्फे अर्ज नोंदणीकरिता- ०२२-६९४६८१००, ऑनलाईन पेमेंट करिता- १८००८९१८२९७,७०६६०४७२२२ हे हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच अधिक माहितीसाठी support@easebuzz.in या ई-मेलवर संपर्क साधता येणार आहे. या सोडतीकरिता मंडळाने अर्जदारांकरिता विभागीय कार्यालय गृहनिर्माण भवन, सी.बी.एस. रोड, महाविर स्तंभाजवळ, छत्रपती संभाजीनगर तळमजल्यावर विशेष मदत कक्ष स्थापन केला आहे, असेही कळविण्यात आले आहे.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

Tech News : उद्या, १ सप्टेंबरपासून पेटीएम बंद होणार आहे का? फोनवर नोटिफिकेशन, सोशल मीडियावर प्रश्नांचा वर्षाव...

Latest News

Tech News : उद्या, १ सप्टेंबरपासून पेटीएम बंद होणार आहे का? फोनवर नोटिफिकेशन, सोशल मीडियावर प्रश्नांचा वर्षाव... Tech News : उद्या, १ सप्टेंबरपासून पेटीएम बंद होणार आहे का? फोनवर नोटिफिकेशन, सोशल मीडियावर प्रश्नांचा वर्षाव...
पेटीएम वापरकर्त्यांना काळजी आहे की त्यांचे यूपीआय ३१ ऑगस्टपासून काम करणे थांबवू शकते. कारण गुगल प्लेने पाठवलेल्या एका नोटिफिकेशनमध्ये म्हटलेय...
Health News : जास्त वेळ बसण्याची सवय धूम्रपानाइतकीच हानिकारक
विशेष मुलाखतीत पल्लवी जोशी स्पष्टच बोलल्या : समस्या आपल्या आत आहेत, त्यात सुधारणा होणे गरजेचे, आपण वर्णद्वेषी अन्‌ लैंगिकतावादी!
संजयनगरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ८ जण पकडले
स्कुटीने शाळेत आली, स्कुटी पार्क केली नंतर गायब झाली दहावीत शिकणारी मुलगी!; केंब्रिज चौकाजवळील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software