पाडसवान हत्‍या प्रकरण : जयश्री दानवेच्या मागावर ३ पथके, पण अजून सापडेना!; अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्‍न

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एन ६ मधील संभाजी कॉलनीत प्रमोद रमेश पाडसवान (वय ३८) यांची हत्‍या करणाऱ्या निमोणे बंधूंची बहीण जयश्री मनोज दानवे हिने अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्‍न सुरू केले आहेत. ती फरारी असून, ३ पथके मागावर असूनही सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्‍त केले जात आहे.

शनिवारी (३० ऑगस्ट) मुख्य हल्लेखोर ज्ञानेश्वर काशीनाथ निमोणे, त्याची आई शशिकला व लहान भाऊ गौरव, सौरभ, वडील काशीनाथ, जावई मनोज दानवे, हत्‍येसाठी चिथावणारे अरुण गव्हाड, मंगेश वाघ या सर्वांची पोलीस कोठडीची मुदत संपली असता दुपारी कडेकोट बंदोबस्तात पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. सर्वांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. डी. जवळगेकर यांनी २ सप्टेंबरपर्यंत पुन्हा पोलीस कोठडी सुनावली. खुनाचा तपास बाकी असल्याने, गुन्ह्याचा आणखी काही उद्देश होता का, मारेकऱ्यांकडून आणखी काही शस्त्रे आहेत का, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली होती.

मारेकरी अनेक दिवसांपासून हत्येचा कट रचत होते, असा संशय पोलिसांना आहे. याबाबत पोलीस तांत्रिक पुरावे गोळा करत आहेत. ज्ञानेश्वरकडे पिस्तूल असल्याच्या आरोपाची खातरजमा केली जात आहे. हत्येवेळी जयश्री व तिचा पती मनोज दानवे तिथे उपस्थित होते. भांडणात ते प्रत्यक्ष सहभागी असल्याचे सीसीटीव्ही फूटेजवरून समोर आले होते. त्यामुळे जयश्रीलाही पोलिसांनी आरोपी केले. त्यानंतर ती फरारी झाली, तशी पोलिसांना अजून सापडलेली नाही. पोलिसांची ३ पथके तिच्या मागावर असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांची बाजू सहायक सरकारी वकील झरीना दुर्राणी यांनी मांडली.

निमोणे कुटुंबीय व दानवे या सहा जणांकडून ॲड. संतोष सरताडे आणि उर्वरित दोन आरोपींच्या वतीने ॲड. सचिन शिंदे यांनी बाजू मांडली. गव्हाड आणि वाघच्या वतीने बाजू मांडताना ॲड. शिंदे यांनी सीसीटीव्हीत दोघेही दिसत नसल्याने त्‍यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करावी, अशी विनंती न्यायालयात केली होती. वादात निमोणे कुटुंबीयांनाही मारहाण झाली असून, त्यांनाही जबर मार लागला आहे. त्यामुळे त्यांनाही पाडसवान कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल करायचा आहे, अशी बाजू ॲड. सरताडे यांनी मांडली.

अशी केली होती हत्या...
निमोने आणि पाडसवान कुटुंबीय संभाजी कॉलनीत समोरासमोर राहतात. घरासमोरील जागेवर कब्जा मिळविण्यासाठी ज्ञानेश्वर निमोने, त्याचे जुळे भाऊ गौरव, सौरभ, वडील काशीनाथ, आई शशिकला, जावई मनोज दानवे यांनी २२ ऑगस्टला दुपारी १ ला पाडसवान कुटुंबावर हल्ला करत प्रमोद पाडसवान (वय ३८) यांची हत्या केली. त्‍यांचे वडील रमेश पाडसवान (वय ६०) व मुलगा रुद्राक्षवरही (वय १७) चाकूचे सपासप वार करून जखमी केले होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरहून पती दोंडाईचाला येऊन मला छळतो, जगणे असह्य केलेय, विवाहितेची सिडको MIDC पोलिसांत तक्रार

Latest News

छत्रपती संभाजीनगरहून पती दोंडाईचाला येऊन मला छळतो, जगणे असह्य केलेय, विवाहितेची सिडको MIDC पोलिसांत तक्रार छत्रपती संभाजीनगरहून पती दोंडाईचाला येऊन मला छळतो, जगणे असह्य केलेय, विवाहितेची सिडको MIDC पोलिसांत तक्रार
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पती दारू पिण्यासाठी पैसे मागतात. नकार दिला की शिवीगाळ करून मारहाण करतात. पतीमुळे मला खूप...
विजेच्या धक्क्याने १८ वर्षीय तरुणाचा मृत्‍यू, गंगापूर तालुक्‍यातील दुर्दैवी घटना
पंक्‍चर झालेल्या कारला मागून सुसाट पिकअपने उडवले, १ गंभीर, मुकुंदवाडीतील पीव्हीआरसमोरील घटना
Tech News : उद्या, १ सप्टेंबरपासून पेटीएम बंद होणार आहे का? फोनवर नोटिफिकेशन, सोशल मीडियावर प्रश्नांचा वर्षाव...
Health News : जास्त वेळ बसण्याची सवय धूम्रपानाइतकीच हानिकारक
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software