मुकुंदवाडीतील बेपत्ता युवकाचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मुकुंदवाडीच्या संजयनगरातून घरून बेपत्ता झालेल्या ३३ वर्षीय युवकाचा मृतदेह शनिवारी (३० ऑगस्ट) दुपारी अडीचला हर्सूल सावंगी शिवारातील (ता. छत्रपती संभाजीनगर) विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. सिद्धार्थ दिलीप पनाड असे त्‍याचे नाव आहे. तो बुधवारपासून (२७ ऑगस्ट) बेपत्ता झाला होता.

सावंगी शिवारात समृद्धी महामार्गालगत असलेल्या हॉटेल समोरच्या विहिरीत सिद्धार्थचा मृतदेह तरंगून आला. नागरिकांनी ११२ क्रमांकावर पोलिसांना कळवले. त्यानंतर फुलंब्रीचे पोलीस निरीक्षक संजय सहाने यांनी सहकाऱ्यांसह घटनास्‍थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी विविध पोलीस ठाण्यांशी संपर्क केला असता मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात २७ ऑगस्टला हरवल्याची नोंद असलेल्या सिद्धार्थचाच हा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. त्‍याच्या कुटुंबीयांना बोलावल्यानंतर ओळख पटली. मृतदेह घाटी रुग्णालयात नेण्यात आला असून, आकस्मिक मृत्‍यूची नोंद करून फुलंब्री पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तपास पोलीस अंमलदार कैलास राठोड करत आहेत. सिद्धार्थने आत्‍महत्‍या केली की अपघाताने तो विहिरीत पडला, याचा तपास केला जात आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वाळूज MIDC त हिट ॲन्‍ड रन : कामावरून घरी परतणाऱ्या तरुणाला आयशर वाहनाने उडवले, जागीच मृत्‍यू

Latest News

वाळूज MIDC त हिट ॲन्‍ड रन : कामावरून घरी परतणाऱ्या तरुणाला आयशर वाहनाने उडवले, जागीच मृत्‍यू वाळूज MIDC त हिट ॲन्‍ड रन : कामावरून घरी परतणाऱ्या तरुणाला आयशर वाहनाने उडवले, जागीच मृत्‍यू
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील जी सेक्टरमध्ये जे. के. कंपनीजवळ आयशर वाहनाने दुचाकीला उडवले. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्‍यू...
छत्रपती संभाजीनगरहून पती दोंडाईचाला येऊन मला छळतो, जगणे असह्य केलेय, विवाहितेची सिडको MIDC पोलिसांत तक्रार
विजेच्या धक्क्याने १८ वर्षीय तरुणाचा मृत्‍यू, गंगापूर तालुक्‍यातील दुर्दैवी घटना
पंक्‍चर झालेल्या कारला मागून सुसाट पिकअपने उडवले, १ गंभीर, मुकुंदवाडीतील पीव्हीआरसमोरील घटना
Tech News : उद्या, १ सप्टेंबरपासून पेटीएम बंद होणार आहे का? फोनवर नोटिफिकेशन, सोशल मीडियावर प्रश्नांचा वर्षाव...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software