पद मिळाले नाही तरी काम करत राहा, डॉ. भागवत कराडांचा नव्या प्रवेशकर्त्यांना सल्ला, म्हणाले, महापौर भाजपचाच करायचाय!; ठाकरे गटाचे उपशहप्रमुख व्यास भाजपात दाखल

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : महापालिका निवडणूक जस जशी जवळ येत आहे, तसे ठाकरे गटातील पदाधिकारी भाजप, शिंदे गटाच्या वळचणीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्‍यानंतर आता उपशहरप्रमुख मिथुन व्यास यांनी शनिवारी (३० ऑगस्ट) भाजपात प्रवेश केला आहे.

तापडिया नाट्यमंदिरात माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, शहराध्यक्ष किशोर शितोळे, बापू घडमोडे, बसवराज मंगरूळे, अनिल मकरिये, संजय जोशी, जगदीश सिद्ध, प्रमोद राठोड, उज्ज्वला दहिफळे यांच्या उपस्थितीत व्यास यांचा प्रवेश सोहळा रंगला. विष्णू क्षीरसागर, योगेश जोशी, शैलेश सुरडकर, आकाश झुंजकर, पंकज जैस्वाल, प्रभात पूरवार, अभिषेक डोंगापुरे, आशितोष खंडेलवाल, रोहित आहुजा, केतन साहुजी, नितीन राठी, तुषार दरख, परेश जैन, तुषार चोरडिया यांच्यासह दीडशे कार्यकर्त्यांनी व्यास यांच्यासोबत भाजपात प्रवेश केल्याचे सांगण्यात आले. या वेळी डॉ. भागवत कराड म्हणाले, की राज्‍य, केंद्रात सत्ता आणली, आता भाजपची सत्ता मनपात आणायची आहे. भाजपचा महापौर करण्यासाठी पक्षाचे काम करत राहा. पद मिळाले नसले तरी काम करत राहा, असा सल्ला दिला. कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, मंत्री अतुल सावे येणार होते. मात्र येऊ शकले नाहीत. सावे यांनी मोबाइलवरून भाषण केले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरहून पती दोंडाईचाला येऊन मला छळतो, जगणे असह्य केलेय, विवाहितेची सिडको MIDC पोलिसांत तक्रार

Latest News

छत्रपती संभाजीनगरहून पती दोंडाईचाला येऊन मला छळतो, जगणे असह्य केलेय, विवाहितेची सिडको MIDC पोलिसांत तक्रार छत्रपती संभाजीनगरहून पती दोंडाईचाला येऊन मला छळतो, जगणे असह्य केलेय, विवाहितेची सिडको MIDC पोलिसांत तक्रार
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पती दारू पिण्यासाठी पैसे मागतात. नकार दिला की शिवीगाळ करून मारहाण करतात. पतीमुळे मला खूप...
विजेच्या धक्क्याने १८ वर्षीय तरुणाचा मृत्‍यू, गंगापूर तालुक्‍यातील दुर्दैवी घटना
पंक्‍चर झालेल्या कारला मागून सुसाट पिकअपने उडवले, १ गंभीर, मुकुंदवाडीतील पीव्हीआरसमोरील घटना
Tech News : उद्या, १ सप्टेंबरपासून पेटीएम बंद होणार आहे का? फोनवर नोटिफिकेशन, सोशल मीडियावर प्रश्नांचा वर्षाव...
Health News : जास्त वेळ बसण्याची सवय धूम्रपानाइतकीच हानिकारक
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software