भिक्षा मागून भावंडांसोबत घरी परतणाऱ्या बालकाला मिनी ट्रॅव्हल्सने उडवले, जागीच मृत्‍यू, पैठणजवळील दुर्घटना

On

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : भिक्षा मागून ५ भावंडे गप्पा मारत घराकडे परतत असताना त्यांच्यापैकी एकाला मिनी ट्रॅव्हल्सने जोरात धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्‍यू झाला. सुदैवाने ४ भावंडं बचावली. ही घटना पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील ढोरकीनजवळ (ता. पैठण) शनिवारी (३० ऑगस्ट) सकाळी ८.३० च्या सुमारास घडली.

पप्पू पंडित भोसले (वय १०, रा. पारधीवस्ती, बोरगाव पैठण ता. पैठण) असे मृत्‍यू झालेल्या बालकाचे नाव आहे. पप्पू व त्याचे सख्खे आणि चुलत बहीण भाऊ असे एकूण ५ जण भिक्षा मागून बालानगर फाट्यावरून हसत खेळत घरी परत होते. छत्रपती संभाजीनगरकडे भरधाव निघालेल्या मिनी ट्रॅव्हल्सने (एमएच ४३, एच ३३३७) पप्पूला उडवले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला पैठण येथील शासकीय रुग्णालयात आणले.

मात्र डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. पप्पूच्या पश्चात आई, वडील, बहीण, भाऊ, आजी, आजोबा आहेत. अपघातानंतर मिनी ट्रॅव्हल्सचालक छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन किलोमीटर अंतरावर वाहन उभे करून पळून गेला. पोलिसांनी वाहन जप्त केले. पप्पूचे वडील पंडित भोसले यांच्या तक्रारीवरून पैठण एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा मिनी ट्रॅव्हल्स चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वाळूज MIDC त हिट ॲन्‍ड रन : कामावरून घरी परतणाऱ्या तरुणाला आयशर वाहनाने उडवले, जागीच मृत्‍यू

Latest News

वाळूज MIDC त हिट ॲन्‍ड रन : कामावरून घरी परतणाऱ्या तरुणाला आयशर वाहनाने उडवले, जागीच मृत्‍यू वाळूज MIDC त हिट ॲन्‍ड रन : कामावरून घरी परतणाऱ्या तरुणाला आयशर वाहनाने उडवले, जागीच मृत्‍यू
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील जी सेक्टरमध्ये जे. के. कंपनीजवळ आयशर वाहनाने दुचाकीला उडवले. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्‍यू...
छत्रपती संभाजीनगरहून पती दोंडाईचाला येऊन मला छळतो, जगणे असह्य केलेय, विवाहितेची सिडको MIDC पोलिसांत तक्रार
विजेच्या धक्क्याने १८ वर्षीय तरुणाचा मृत्‍यू, गंगापूर तालुक्‍यातील दुर्दैवी घटना
पंक्‍चर झालेल्या कारला मागून सुसाट पिकअपने उडवले, १ गंभीर, मुकुंदवाडीतील पीव्हीआरसमोरील घटना
Tech News : उद्या, १ सप्टेंबरपासून पेटीएम बंद होणार आहे का? फोनवर नोटिफिकेशन, सोशल मीडियावर प्रश्नांचा वर्षाव...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software