छ. संभाजीनगर जिल्ह्यातील शाळांत आता रोज एक तास खेळासाठी; जिल्हाधिकारी स्वामी यांची घोषणा

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : खेळल्याने शारीरिक मानसिक स्वास्थ सुधारते. खिलाडू वृत्ती वाढीस लागते. त्यामुळे मुलांनो भरपूर खेळा... पण मैदानावर; मोबाईलवर नव्हे, अशा शब्दांत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी विद्यार्थ्यांना खेळण्याचा मंत्र दिला. जिल्ह्यातील शाळांमध्ये ‘दररोज एक तास खेळासाठी’ हा उपक्रम सुरू करत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्त विभागीय क्रीडा संकुलात शुक्रवारी (२९ ऑगस्ट)  प्राविण्य प्राप्त खेळाडूंचा सत्कार, क्रीडा शिक्षक, मुख्याध्यापक प्राचार्य यांना प्रोत्साहनपर अनुदान धनादेश वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा पुरस्कार विजेते खेळाडू अनिता चव्हाण, डॉ. केदार रहाणे, उद्धव टकले, शशिकांत वडाप तसेच मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, प्राचार्य खेळाडू आदी उपस्थित होते. प्रारंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

जिल्हाधिकारी स्वामी यांच्या हस्ते सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले, की हल्ली मोबाईलच्या वापरामुळे मैदाने ओस पडली आहेत. मुले खेळतात पण ते मोबाईल मधले गेम असतात. हे अपेक्षित नाही. मैदानावर खेळ खेळल्याने आपले शारीरिक स्वास्थ्य सुदृढ होते. मानसिक स्वास्थ्य सुधारते. जय पराजय पचवण्याची क्षमता निर्माण होते. शालेय जीवनातील हे क्रीडा विषयक अनुभव पुढे आयुष्यातील विविध प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी कामात येतात, असे ते म्हणाले. जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी प्रास्ताविक केले. उपसंचालक शेखर पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. उद्या, ३१ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता विभागीय क्रीडा संकुल येथून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

Tech News : उद्या, १ सप्टेंबरपासून पेटीएम बंद होणार आहे का? फोनवर नोटिफिकेशन, सोशल मीडियावर प्रश्नांचा वर्षाव...

Latest News

Tech News : उद्या, १ सप्टेंबरपासून पेटीएम बंद होणार आहे का? फोनवर नोटिफिकेशन, सोशल मीडियावर प्रश्नांचा वर्षाव... Tech News : उद्या, १ सप्टेंबरपासून पेटीएम बंद होणार आहे का? फोनवर नोटिफिकेशन, सोशल मीडियावर प्रश्नांचा वर्षाव...
पेटीएम वापरकर्त्यांना काळजी आहे की त्यांचे यूपीआय ३१ ऑगस्टपासून काम करणे थांबवू शकते. कारण गुगल प्लेने पाठवलेल्या एका नोटिफिकेशनमध्ये म्हटलेय...
Health News : जास्त वेळ बसण्याची सवय धूम्रपानाइतकीच हानिकारक
विशेष मुलाखतीत पल्लवी जोशी स्पष्टच बोलल्या : समस्या आपल्या आत आहेत, त्यात सुधारणा होणे गरजेचे, आपण वर्णद्वेषी अन्‌ लैंगिकतावादी!
संजयनगरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ८ जण पकडले
स्कुटीने शाळेत आली, स्कुटी पार्क केली नंतर गायब झाली दहावीत शिकणारी मुलगी!; केंब्रिज चौकाजवळील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software