छत्रपती संभाजीनगरला भरली हुडहुडी!; पारा घसरला १२.८ वर...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : अतिपावसानंतर आता छत्रपती संभाजीनगर शहराला अतिथंडीचा सामना यंदा करावा लागणार, असे चित्र हिवाळ्याच्या सुरुवातीच्या काळातच स्पष्ट झाले आहे. गेल्या आठवड्यापासून किमान तापमान रोज घसरत असून, आज (१० नोव्हेंबर) सकाळी तर अक्षरशः शहरवासियांना हुडहुडी भरली आहे. काल रविवारी दिवसभरात किमान तापमान १२.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. हंगामातील आतापर्यंतचे हे सर्वात कमी तापमान ठरले. उबदार कपड्यांची मागणी आता वाढू लागली आहे.

उत्तर भारतात शीत लहरी निर्माण झाल्यामुळे मध्य भारतासह महाराष्ट्रातील किमान तापमानात कमालीची घट झाली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात थंडीची लाट आली आहे. गेल्या आठवड्यापासून रात्रीचे तापमान सातत्याने घटत चालले आहे. दिवसा कोरडे व सौम्य ऊन पडत असून, रविवारी छत्रपती संभाजीनगर शहराचे कमाल तापमान ३०.४ अंशांवर होते, तर किमान तापमान १२.८ अंश इतके घसरले होते. सकाळी आणि रात्री रस्त्यांवरील वर्दळ कमी झाली आहे.

थंडीपासून बचावासाठी जॅकेट, मफलर, स्वेटरसारख्या उबदार कपड्यांची खरेदी जोरात सुरू झाली आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत किमान तापमान २ ते ४ अंशांनी आणखी घसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. धुळे आणि जळगाव सध्या महाबळेश्वरसारखा अनुभव घेत आहे. धुळ्याचे कमाल तापमान रविवारी ८ तर जळगावचे १०.५ इतके नोंदवले गेले. महाबळेश्वरचे तापमान १२.८ इतके नोंदवले गेले. गेल्यावर्षी याच दिवशी छत्रपती संभाजीनगरचे तापमान कमाल ३२ तर किमान १८ इतके होते. यंदा थंडीने विक्रमच केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कंडोम पॅकिंग मशीन देण्याच्या आमिषाने साडेपाच लाखांचा गंडा!; वाळूज MIDC तील घटना

Latest News

कंडोम पॅकिंग मशीन देण्याच्या आमिषाने साडेपाच लाखांचा गंडा!; वाळूज MIDC तील घटना कंडोम पॅकिंग मशीन देण्याच्या आमिषाने साडेपाच लाखांचा गंडा!; वाळूज MIDC तील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील कंडोम उत्पादन करणाऱ्या कंपनीला कंडोम पॅकिंग मशीन देण्याचे आमिष दाखवून तब्बल ५...
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्‍महत्‍या!
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!;  महसूल मंत्र्यांची घोषणा
चक्रावणारी घटना, दोन मित्र, कार, महिला, तिचे मित्र अन्‌ लूट... जयभवानीनगर ते सिडको चौकापर्यंत ते घडलं ते अचंबित करणारे... कसं घडलं ते विस्ताराने वाचा...
घर बांधणाऱ्या ठेकेदाराने कमालच केली, अर्धवट बांधकाम करून गेटला लावले स्वतःचे कुलूप!; दाम्पत्य हैराण-परेशान... मुकुंदवाडी पोलिसांत धाव!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software