दोघांच्या अंगावर ॲसिड कुणी फेकले, विष्णूनगरातील घटनेचे गूढ वाढले... CCTV त कुणीच नाही दिसले...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दोघांच्या अंगावर ॲसिड फेकून कुणीतरी पळाले. पण सीसीटीव्हीत कुणीच दिसले नाही. त्यामुळे घटनेचे गूढ वाढले असून, ॲसिड हल्ल्यात दोघे जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना विष्णूनगरमधील साई ऑटो गॅरेजमध्ये रविवारी (८ मार्च) सकाळी ११:१० वाजता घडली.

सिराज नजीर शेख (वय २६, रा. भारतनगर, गारखेडा) आणि वैभव अनिलराव पुजदेकर (रा. शेंद्रा) अशी जखमींची नावे आहेत. सिराज गॅरेज भागीदारीत चालवतो. वैभव हे गॅरेजमध्ये टायर बदलण्यासाठी दुचाकी घेऊन आले होते. सिराजने सकाळी ८ वाजता गॅरेज उघडले. ११ च्या सुमारास पुजदेकर दुचाकी (क्र. एमएच ४४ पी ५४८०) घेऊन आले. सिराज हे टायर बदलत असताना खाली बसले होते, तर वैभव गॅरेजमधील खुर्चीवर बसले होते.

अचानक सिराज यांच्या कपाळावर डावीकडे, गालावर, डाव्या खांद्यावर व पाठीवर, डाव्या पायावर तीव्र आग झाली. वैभव यांच्याही डाव्या गालावर, हातावर दाहक पदार्थ उडाला. दोघेही जोरात ओरडले. बाजूच्या दुकानातील जारमधून पाणी घेऊन अंगावर टाकले. दोघांच्या कपड्यांवर छिद्र पडले होते. माहिती मिळताच जवाहरनगर पोलीस घटनास्थळी धावले. दोन्ही जखमींना घाटी रुग्णालयात दाखल केले.

सिराजच्या तक्रारीवरून ॲसिड फेकणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांनी दिली. पोलिसांनी परिसरातील रस्त्यासह इतर भागांतील सीसीटीव्हींची तपासणी केली असता ॲसिड टाकून कोणी पळून गेल्याचे किंवा वेगात गाडी घेऊन जाताना दिसले नाही. गॅरेजच्या परिसरातही ग्राहकांसह नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. त्यातील कोणालाही अॅसिड फेकणारे दिसून आले नाहीत. त्यामुळे या घटनेचे गूढ वाढले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सिडको बसस्थानक-हर्सूल रस्त्यावर सुसाट ब्रेझा कारचा थरार; आधी रिक्षा, नंतर दुचाकीला उडवले, केटररर्स व्यावसायिकाचा मृत्यू, रिक्षाचालक जखमी

Latest News

सिडको बसस्थानक-हर्सूल रस्त्यावर सुसाट ब्रेझा कारचा थरार; आधी रिक्षा, नंतर दुचाकीला उडवले, केटररर्स व्यावसायिकाचा मृत्यू, रिक्षाचालक जखमी सिडको बसस्थानक-हर्सूल रस्त्यावर सुसाट ब्रेझा कारचा थरार; आधी रिक्षा, नंतर दुचाकीला उडवले, केटररर्स व्यावसायिकाचा मृत्यू, रिक्षाचालक जखमी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको बसस्थानक ते हर्सूल या जळगाव रोडवरील खा. काळे यांच्या घरासमोर सुसाट ब्रेझा कारने...
इमर्जन्सीसाठी पेट्रोल, डिझेलचा साठा राखीव ठेवा, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे सर्व इंधन विक्री कंपन्यांना आदेश
कारखान्यासह बेकरी शॉपला भीषण आगीने वाळूज MIDC त माजला हल्लकल्लोळ!; कोट्यवधींचे नुकसान
युवकाची शेतात गळफास घेऊन आत्‍महत्या, सिल्लोडच्या सिसारखेड्याची घटना
राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या वक्तव्यावरून मंत्री संजय शिरसाटांचा यूटर्न!; म्हणाले, मला लई त्रास देतात हे लोक...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software