- News
- जिल्हा न्यूज
- अजिंठ्यात पत्रकाराला धमकी, मारहाण; पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल
अजिंठ्यात पत्रकाराला धमकी, मारहाण; पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथे पत्रकार मुनीरखाँ चाँद खाँ पठाण (वय ४२) यांना गावातीलच शेख नईम शेख शरीफ याने शिवीगाळ करून मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली. शनिवारी (७ मार्च) अजिंठा पोलिसांनी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत नईमविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अजिंठा गावातील पाणी शुद्धीकरणाच्या चौकशीसाठी पंचायत समितीचे अधिकारी आले होते. या घटनेचे व्हिडीओ चित्रण आणि माहिती घेत असताना शेख नईम याने पत्रकार पठाण यांना विरोध केला. तू कसला पत्रकार आहेस, असे म्हणत शिवीगाळ करत पठाण यांना चापट-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यांचा मोबाइल हिसकावून घेत रस्त्यावर फेकून दिला. त्यांना व त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार पठाण यांनी अजिंठा पोलीस ठाण्यात केली. ही घटना सोमवारी (२ मार्च) दुपारी २ च्या सुमारास घडल्याचे पठाण यांनी तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे करत आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
युवकाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या, सिल्लोडच्या सिसारखेड्याची घटना
By City News Desk
Latest News
09 Mar 2026 15:14:36
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको बसस्थानक ते हर्सूल या जळगाव रोडवरील खा. काळे यांच्या घरासमोर सुसाट ब्रेझा कारने...

