पिकाला पाणी देताना साप चावल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथे शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या वृद्धाला सापाने चावा घेतला. ही घटना रविवारी (८ मार्च) दुपारी घडली. हरिश्चंद्र राऊबा थोरात (वय ८५) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

हरिश्चंद्र थोरात यांची कोपरवेल शिवारात शेती आहे. पिकाला पाणी देत असताना साप चावल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने नाचनवेल येथील खासगी रुग्णालयात धाव घेतली. मात्र प्रकृती खालावत गेल्याने नातेवाइकांनी त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला हलविण्याची तयारी केली. छत्रपती संभाजीनगरला घेऊन जात असतानाच रस्त्यात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सेवानिवृत्त सैनिक संतोष थोरात यांचे ते वडील होत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सिडको बसस्थानक-हर्सूल रस्त्यावर सुसाट ब्रेझा कारचा थरार; आधी रिक्षा, नंतर दुचाकीला उडवले, केटररर्स व्यावसायिकाचा मृत्यू, रिक्षाचालक जखमी

Latest News

सिडको बसस्थानक-हर्सूल रस्त्यावर सुसाट ब्रेझा कारचा थरार; आधी रिक्षा, नंतर दुचाकीला उडवले, केटररर्स व्यावसायिकाचा मृत्यू, रिक्षाचालक जखमी सिडको बसस्थानक-हर्सूल रस्त्यावर सुसाट ब्रेझा कारचा थरार; आधी रिक्षा, नंतर दुचाकीला उडवले, केटररर्स व्यावसायिकाचा मृत्यू, रिक्षाचालक जखमी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको बसस्थानक ते हर्सूल या जळगाव रोडवरील खा. काळे यांच्या घरासमोर सुसाट ब्रेझा कारने...
इमर्जन्सीसाठी पेट्रोल, डिझेलचा साठा राखीव ठेवा, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे सर्व इंधन विक्री कंपन्यांना आदेश
कारखान्यासह बेकरी शॉपला भीषण आगीने वाळूज MIDC त माजला हल्लकल्लोळ!; कोट्यवधींचे नुकसान
युवकाची शेतात गळफास घेऊन आत्‍महत्या, सिल्लोडच्या सिसारखेड्याची घटना
राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या वक्तव्यावरून मंत्री संजय शिरसाटांचा यूटर्न!; म्हणाले, मला लई त्रास देतात हे लोक...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software