युवकाची शेतात गळफास घेऊन आत्‍महत्या, सिल्लोडच्या सिसारखेड्याची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ३६ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिसारखेडा (ता. सिल्लोड) शिवारात रविवारी (८ मार्च) सकाळी १० च्या सुमारास समोर आली. 

जनार्दन हरिलाल राऊत (रा. सिसारखेडा) असे आत्‍महत्या केलेल्याचे नाव आहे. सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. राऊत यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यांना तातडीने सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, राऊत यांच्याकडे अल्पशेती असून, शेतीसाठी त्यांनी २ लाख रुपयांचे कर्ज खासगी बँकेकडून काढले होते. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे अपेक्षित शेती उत्पन्न हाती आले नाही. त्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले होते. कर्जफेडीला घेऊन चिंतित राहत होते. राऊत यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

चक्रावणारी घटना, दोन मित्र, कार, महिला, तिचे मित्र अन्‌ लूट... जयभवानीनगर ते सिडको चौकापर्यंत ते घडलं ते अचंबित करणारे... कसं घडलं ते विस्ताराने वाचा...

Latest News

चक्रावणारी घटना, दोन मित्र, कार, महिला, तिचे मित्र अन्‌ लूट... जयभवानीनगर ते सिडको चौकापर्यंत ते घडलं ते अचंबित करणारे... कसं घडलं ते विस्ताराने वाचा... चक्रावणारी घटना, दोन मित्र, कार, महिला, तिचे मित्र अन्‌ लूट... जयभवानीनगर ते सिडको चौकापर्यंत ते घडलं ते अचंबित करणारे... कसं घडलं ते विस्ताराने वाचा...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पुंडलिकनगर पोलिसांपुढे रविवारी (८ मार्च) एक विचित्र, रहस्यमयी घटना आली. एका ३९ वर्षांच्या पुरुषाने...
घर बांधणाऱ्या ठेकेदाराने कमालच केली, अर्धवट बांधकाम करून गेटला लावले स्वतःचे कुलूप!; दाम्पत्य हैराण-परेशान... मुकुंदवाडी पोलिसांत धाव!!
चोरट्यांनी हद्दच केली... चक्क न्यायाधीशांच्या बंगल्यावर डल्ला; सिडको एन ३ मधील घटना
सिडको बसस्थानक-हर्सूल रस्त्यावर सुसाट ब्रेझा कारचा थरार; आधी रिक्षा, नंतर दुचाकीला उडवले, केटररर्स व्यावसायिकाचा मृत्यू, रिक्षाचालक जखमी
इमर्जन्सीसाठी पेट्रोल, डिझेलचा साठा राखीव ठेवा, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे सर्व इंधन विक्री कंपन्यांना आदेश
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software