घर बांधणाऱ्या ठेकेदाराने कमालच केली, अर्धवट बांधकाम करून गेटला लावले स्वतःचे कुलूप!; दाम्पत्य हैराण-परेशान... मुकुंदवाडी पोलिसांत धाव!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : घर बांधण्याचे काम दिलेल्या ठेकेदाराने पूर्ण घर तर बांधून दिलेच नाही, पण वारंवार जास्तीचे पैसे मागून दाम्पत्याला वेठीस धरून चक्क घराचे काम अर्धवट सोडून स्वतःचे कुलूपही गेटला लावले. ही घटना मुकुंदवाडीत घडली. मुकुंदवाडी पोलिसांनी ठेकेदाराविरुद्ध रविवारी (८ मार्च) गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात सोपान निवृत्ती तारो (वय ५२, रा. त्रिलोक रेसीडेन्सी अपार्टमेंट, राजश्री शाहू महाराज हायस्कूलजवळ मुकुंदवाडी) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते पत्नी व आईसह राहतात. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात नोकरीला आहेत. त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका आहेत. तक्रारीत म्हटले आहे, की तारो यांनी मुकुंदवाडीतील एकविरा हॉस्पिटलजवळ प्लॉट खरेदी केलेला आहे. प्लॉटवर घर बांधण्यासाठी त्यांनी सोहम कन्स्ट्रक्शनचे ठेकेदार शुभम संजय लोळगे (रा. एकनाथनगर उस्मानपुरा) यांना काम दिले. तसा लोळगे आणि तारो यांच्यात बांधकाम करारनामा झाला होता. मात्र ठेकेदार लोळगे यांनी प्रत्येकवेळी काही ना काही कारण सांगून करारनाम्याद्वारे ठरलेल्या रकमेपेक्षा जास्तीची रक्कम घेऊनसुध्दा मुदतीत बांधकाम पूर्ण करून दिले नाही, असे तक्रारीत म्हटले आहे.

त्यामुळे तारो यांनी लोळगे यांना वकिलामार्फत नोटीस पाठविली. बांधकाम पूर्ण न करताच पुन्हा पैशाची मागणी करू लागल्याने तारो यांनी त्यांना बांधकाम पूर्ण झाल्याशिवाय पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे लोळगे यांनी २४ जानेवारी २०२६ पासून काम बंद केले. ३० जानेवारी २०२६ रोजी दुपारी साडेतीनला त्यांनी बांधकामाचे ठिकाणी येऊन वाल कंपाऊंडच्या गेटला आतून स्वतःचे कुलूप लावले. तारो यांना त्यांच्याच घरात प्रवेश करण्यास मज्जाव केला. तारो यांच्या पत्नीने लोळगे यांना कॉल केला असता त्यांनी चक्क शिवीगाळ करून धमकी दिली. अखेर हे प्रकरण आता मुकुंदवाडी पोलिसांत गेले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार प्रभाकर भिडे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

चक्रावणारी घटना, दोन मित्र, कार, महिला, तिचे मित्र अन्‌ लूट... जयभवानीनगर ते सिडको चौकापर्यंत ते घडलं ते अचंबित करणारे... कसं घडलं ते विस्ताराने वाचा...

Latest News

चक्रावणारी घटना, दोन मित्र, कार, महिला, तिचे मित्र अन्‌ लूट... जयभवानीनगर ते सिडको चौकापर्यंत ते घडलं ते अचंबित करणारे... कसं घडलं ते विस्ताराने वाचा... चक्रावणारी घटना, दोन मित्र, कार, महिला, तिचे मित्र अन्‌ लूट... जयभवानीनगर ते सिडको चौकापर्यंत ते घडलं ते अचंबित करणारे... कसं घडलं ते विस्ताराने वाचा...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पुंडलिकनगर पोलिसांपुढे रविवारी (८ मार्च) एक विचित्र, रहस्यमयी घटना आली. एका ३९ वर्षांच्या पुरुषाने...
घर बांधणाऱ्या ठेकेदाराने कमालच केली, अर्धवट बांधकाम करून गेटला लावले स्वतःचे कुलूप!; दाम्पत्य हैराण-परेशान... मुकुंदवाडी पोलिसांत धाव!!
चोरट्यांनी हद्दच केली... चक्क न्यायाधीशांच्या बंगल्यावर डल्ला; सिडको एन ३ मधील घटना
सिडको बसस्थानक-हर्सूल रस्त्यावर सुसाट ब्रेझा कारचा थरार; आधी रिक्षा, नंतर दुचाकीला उडवले, केटररर्स व्यावसायिकाचा मृत्यू, रिक्षाचालक जखमी
इमर्जन्सीसाठी पेट्रोल, डिझेलचा साठा राखीव ठेवा, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे सर्व इंधन विक्री कंपन्यांना आदेश
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software