ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!;  महसूल मंत्र्यांची घोषणा

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील ब्रिजवाडी येथील सर्वे क्र.१, गट क्र. ३० मधील क्षेत्रफळ ५४ एकर ३० गुंठे या कोट्यवधी रुपयांच्या जमीन-खरेदी विक्री प्रकरणात विभागीय आयुक्‍त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या नाव, शिक्क्यांचा वापर करून बनावट आदेश काढण्यात आल्याची घटना गेल्या वर्षी २८ नोव्‍हेंबरला समोर आली होती. या प्रकरणात सिटी चौक पोलिसांनी बनावट आदेश काढणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. ही जमीन गायरान आहे. या प्रकरणाची आता गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) ३ महिन्यांत चौकशी होईल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले आहे. या घोटाळ्याचे वृत्त सर्वप्रथम ‘मेट्रोपोलिस पोस्ट’ने प्रसिद्ध केले होते.

काय आहे प्रकरण...
२७ नोव्‍हेंबर २०२५ रोजी सकाळी १० ला गेवराईचे नायब तहसीलदार संजय सोनवणे यांनी त्यांच्या व्हॉटस् ॲप नंबरवरून विभागीय आयुक्तांचे स्वीय सहायक दीपक आगळे यांच्या व्हॉटस् ॲपवर प्रोव्हिजनल कॉपी महाराष्ट्र शासन असा चार ठिकाणी शिक्का व त्यावर तीन ठिकाणी सही केलेला आदेश पाठवून हा आदेश आपल्या कार्यालयाकडून निर्गमित केला आहे का, याबाबत विचारणा केली. त्यावरून असे निदर्शनास आले की, हा आदेश या कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आलेला नाही. हे प्रकरण गंभीर असल्याने सखोल चौकशी करण्यात आली. त्यावरून असे लक्षात आले, की ब्रिजवाडी (ता. छत्रपती संभाजीनगर) येथील सर्वे क्र.१, गट क्र. ३० मधील क्षेत्रफळ ५४ एकर ३० गुंठे या जमीन खरेदी व विक्री प्रकरणात बनावट आदेश तयार करून त्यावर विभागीय आयुक्‍त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे नाव व पदनामासह बनावट स्वाक्षरी करून बनावट आदेश तयार करण्यात आला आहे. या आदेशाचे अवलोकन केले असता आदेशावर असलेल्या सह्या, कार्यालयीन शिक्के हे बनावट असून त्यावर Provisional Copy महाराष्ट्र शासन असा चार ठिकाणी शिक्का व त्यावर तीन ठिकाणी सही केलेली आहे. हा बनावट आदेश तयार करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्यासाठी वरिष्ठांनी नायब तहसीलदार संजय शिंदे यांना सांगितले. त्यानुसार त्यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 

Latest News

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना  पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांत माझ्याविरुद्ध साक्ष का दिली, असे म्हणत टवाळखोराने साथीदारांसोबत मिळून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी...
शू रॅकमध्ये फ्‍लॅटची चावी ठेवणे पडले महागात, १ लाख ८० हजारांच्या साहित्यावर चोरट्याचा डल्ला!; सुराणानगरातील घटना
कंडोम पॅकिंग मशीन देण्याच्या आमिषाने साडेपाच लाखांचा गंडा!; वाळूज MIDC तील घटना
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्‍महत्‍या!
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!;  महसूल मंत्र्यांची घोषणा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software