पैठणमध्ये भक्तीचा महापूर, शासकीय महापूजेने षष्ठी सोहळ्याला सुरुवात, ‘भानुदास-एकनाथ'च्या गजराने शहर दुमदुमले!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पैठणनगरीत संत एकनाथ महाराज षष्ठी सोहळ्याचा उत्साह ओसंडून वाहत आहे. ‘भानुदास-एकनाथ'च्या गजराने शहर भक्तिमय झाले आहे. रविवारी (८ मार्च) सायंकाळपर्यंत राज्यभरातून सुमारे ७०० दिंड्यांसह ५ लाखांहून अधिक वारकरी पैठणनगरीत दाखल झाले असून, गोदावरीच्या विस्तीर्ण वाळवंटात भक्तांचा विशाल मेळा भरला आहे. आज, ९ मार्चला संत एकनाथ महाराज मंदिरात शासकीय महापूजेने षष्ठी सोहळ्याला प्रारंभ झाला.

या वेळी संस्थानचे अध्यक्ष आ. विलास भुमरे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सपत्नीक महापूजा केली. त्यानंतर नाथ वंशजांच्या मानाच्या दिंडीचे शहरात आगमन झाले. त्याचबरोबर सोहळ्याची औपचारिक सुरुवात झाली. रविवारी (८ मार्च) शहराच्या वेशीवर आ. विलास भुमरे, नगराध्यक्ष विद्या भूषण कावसानकर, मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, उपमुख्याधिकारी सोमनाथ गर्जे व इतर पदाधिकाऱ्यांनी वारकऱ्यांचे पुष्पवृष्टी करत स्वागत केले. वारकऱ्यांसाठी गोदावरी वाळवंट व शहर परिसरात पिण्याचे पाणी, फिरती स्वच्छतागृहेआणि निवासाची चांगली व्यवस्था करण्यात आली आहे.

स्वच्छता राखण्यासाठी नगरपरिषदेचे कर्मचारी अहोरात्र कार्यरत असल्याची माहिती न. प.च्या मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांनी दिली. एसटी महामंडळातर्फे पाच एकर जागेत तात्पुरते बसस्थानक उभारलेले आहे. एसटीने वारकऱ्यांच्या परतीच्या प्रवासासाठी विशेष बसफेऱ्यांचे नियोजन केल्याची माहिती आगार प्रमुख गजानन मडके यांनी दिली. पोलीस प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवला असून, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील व पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांची बंदोबस्तावर विशेष देखरेख आहे. चोरीच्या घटना रोखण्यासाठी पथके साध्या वेशातही तैनात आहेत. पोलिसांच्या मदतीसाठी २०० स्वयंसेवक नियुक्त आहेत.

पासद्वारे थेट दर्शन...
यंदा प्रथमच २५० रुपयांच्या व्हीआयपी पासद्वारे नाथ समाधीचे थेट दर्शन घेता येणार आहे. नाथ मंदिर परिसर आणि नगर परिषदेच्या यात्रा कॅम्पमध्ये हे पास मिळतील. पैसे रोख किंवा ऑनलाइन देता येतील.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सिडको बसस्थानक-हर्सूल रस्त्यावर सुसाट ब्रेझा कारचा थरार; आधी रिक्षा, नंतर दुचाकीला उडवले, केटररर्स व्यावसायिकाचा मृत्यू, रिक्षाचालक जखमी

Latest News

सिडको बसस्थानक-हर्सूल रस्त्यावर सुसाट ब्रेझा कारचा थरार; आधी रिक्षा, नंतर दुचाकीला उडवले, केटररर्स व्यावसायिकाचा मृत्यू, रिक्षाचालक जखमी सिडको बसस्थानक-हर्सूल रस्त्यावर सुसाट ब्रेझा कारचा थरार; आधी रिक्षा, नंतर दुचाकीला उडवले, केटररर्स व्यावसायिकाचा मृत्यू, रिक्षाचालक जखमी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको बसस्थानक ते हर्सूल या जळगाव रोडवरील खा. काळे यांच्या घरासमोर सुसाट ब्रेझा कारने...
इमर्जन्सीसाठी पेट्रोल, डिझेलचा साठा राखीव ठेवा, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे सर्व इंधन विक्री कंपन्यांना आदेश
कारखान्यासह बेकरी शॉपला भीषण आगीने वाळूज MIDC त माजला हल्लकल्लोळ!; कोट्यवधींचे नुकसान
युवकाची शेतात गळफास घेऊन आत्‍महत्या, सिल्लोडच्या सिसारखेड्याची घटना
राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या वक्तव्यावरून मंत्री संजय शिरसाटांचा यूटर्न!; म्हणाले, मला लई त्रास देतात हे लोक...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software